चार बोटी पकडल्या : साहित्याची लावली विल्हेवाट
परप्रांतीय कामगारांनी काढला पळ
मालवण / प्रतिनिधी
मालवण तालुक्यात बेकायदेशीर वाळू उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी तहसिलदार वर्षा झालटे यांनी धडक मोहीम राबवली असून सर्वत्र गस्ती पथके तैनात केली आहेत. शनिवारी पहाटे बांदिवडे सय्यद जुवा खाडी पात्रालगत चार बोटी वाळू उत्खनन करण्याच्या उद्देशाने उभ्या असलेल्या दिसून आल्या. तसेच परप्रांतीय कामगारही बोटीच्या दिशेने जात असल्याचे दिसून आले. महसूल विभागाच्या पथकाची माहिती मिळताच परप्रांतीय कामगार होड्या तिथेच टाकून पळून गेले. महसूलच्या पथकाने वाळू उत्खनन करण्यासाठी असलेल्या साहित्याची आणि होड्यांची विल्हेवाट लावली. महसूलच्या धडक कारवाईमुळे बेकायदेशी वाळू उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.









