Statement for road asphalting
वायरी भूतनाथ येथील शासकीय तंत्रनिकेतन जवळून देवली, परुळे कडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी अतिशय धोकादायक बनला आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून कधीही गंभीर अपघात होऊ शकतो. यामुळे या रस्त्याचे तातडीने खडीकरण व डांबरीकरण करण्यात त्यावे अशी मागणी वायरी भूतनाथ येथील ग्रामस्थांनी केली आहे. याबाबतचे निवेदन बांधकाम विभागाला देण्यात आले आहे. यावेळी शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे शाखा प्रमुख जयवंत लुडबे, हनुमंत लुडबे, विश्वास लुडबे, महेश उर्फ बंड्या लुडबे, प्रसाद चव्हाण, संदीप बोडवे, सिद्धेश लुडबे, मुन्ना लुडबे, यांसह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. पंचायत समिती बांधकाम विभागाचे अभियंता अक्षय मगर यांनी हे निवेदन स्वीकारले.
रेकोबा घाटी संपल्या नंतर देवलीच्या दिशेने जाणारा पुढील रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. शालेय आणि तंत्रंनिकेतनचे विद्यार्थी, वायरी देवलीचे नागरिक, पर्यटक यामुळे या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. हा रस्ता तातडीने दुरुस्ती होणे गरजेचे आहे अशी मागणी जयवंत लुडबे यांनी केली. यात दिरंगाई झाल्या ग्रामस्थांना आंदोलनाचा अथवा उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल असा इशाराही यावेळी ग्रामस्थांनी दिला.
मालवण / प्रतिनिधी