कोल्हापूर प्रतिनिधी
आजही समाजात वंश वाढवण्यासाठी मुलगाच हवा मुलगी नको अशी मानसिकता आहे. घरी मुलगी जन्माला आले की काहीसा नाराजीचा सुर असतो.. मात्र कोल्हापुरातील पाचगाव मधल्या पाटील कुटुंबीयांनी एक आगळ वेगळा आदर्श घालून दिला आहे.पाचगाव मधील शांतीनगर मध्ये राहणाऱ्या पाटील कुटुंबीयांनी घरी जन्माला आलेल्या इरा या चक्क हत्तीवरून मिरवणूक काढत स्वागत केलं.
सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेले गिरीश आणि मनीषा पाटील लग्नाच्या तब्बल आठ वर्षानंतर मुलगी झाली आहे. त्या आनंदात पाटील कुटुंबीयांनी आज ईराच हत्तीवरून मिरवणूक काढत तसंच ढोल ताशाच्या गजरात स्वागत केलं. इतकंच नाही तर यावेळी मुलीच्या जन्माचे स्वागत करण्याचा संदेश या निमित्ताने पाटील कुटुंबीयांनी दिला आहे. तर एरवी मुलगी झाल्यानंतर घरच्या दुषण दिली जातात मात्र गिरीश पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मुलीचे केलेले स्वागत पाहून परिसरात त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Previous Articleडोंगरसोनीच्या सरपंचासह पाच सदस्य अपात्र
Next Article बारावी पुरवणी परीक्षेची अर्ज प्रक्रिया सोमवारपासून









