कोल्हापूर: राहुल गडकर
संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या चंद्रयान तीन या मोहिमेकडे लागले होते. या मोहिमाला इस्रोने आपल्या प्रयत्नांची परकाष्टा करत स्वप्न सार्थकी केले. आज चंद्रयान यशस्वीपणे चंद्रावर उतरले. इस्रोच्या या कार्याला सलाम म्हणून कोल्हापुरातल्या शिवाजी पेठेतल्या एका तरुण मंडळांनी गणेश उत्सवाच्या पावतीवरून अभिवादन केला आहे. शिवाजी पेठेतले हे चंद्रयान दारोदारी जाऊन इस्रोच्या कार्याची माहिती देणार आहे. मरगाई गल्ली मंडळाच्यावतीने ही पावती वर्गणी देणाऱ्यांच्या घरात असणार आहे.
या पावती मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था मधील सर्व शास्त्रज्ञांना मानाचा सलाम केला आहे. त्याचबरोबर अमेरिका, रशिया, चीन यानंतर अशी कामगिरी करणारा भारत हा चौथा देश ठरणार आहे. अशी माहिती या माध्यमातून दिले आहे. तसेच भारताच्या अंतराळ संशोधनात महत्त्वाचे योगदान असणाऱ्या माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम व डॉ. विक्रम साराभाई यांना देखील अभिवादन केले आहे. त्याचबरोबर संपूर्ण चंद्रयान 3 चा संपूर्ण प्रवासाची माहिती असणार आहे.









