कोल्हापूर / सुधाकर काशीद :
कोल्हापुरातील फडशा आणि खूट पत्र यापासून सुरू झालेली न्यायदानाची यंत्रणा आज उच्च न्यायालयाच्या खंडपीठापर्यंत येऊन पोहोचली आहे . कोल्हापुरातील न्यायालयीन यंत्रणेचा इतिहास खूप वेगळा आणि अनोखा आहे .आज उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात सुरू होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे .खंडपीठासाठी कोल्हापूरकरांनी दीर्घकालीन केलेल्या लढ्याला आज यश आले आहे पण पटणार नाही.कोल्हापुरात यापूर्वीच म्हणजे संस्थान काळात उच्च व सर्वोच्च न्यायालयाचेही खंडपीठ होते . हायकोर्टासाठी तीन व सुप्रीम कोर्टासाठी सहा न्यायाधीशाचे खंडपीठ होते . कोल्हापुरात अधिकृत न्याय यंत्रणा सुरू होण्यापूर्वी गावातल्या देवळात पारावर किंवा सार्वजनिक ठिकाणी गावातील पंचमंडळी बसायची .आणि त्यांच्यापुढे दोन्ही बाजूंनी आपले म्हणणे मांडले की पंच निकाल द्यायचे . या निकालास पंचायत नामा किंवा ठफडशा ठअसे म्हणत .हा ठफडशा ठपडला की प्रकरण संपायचे. आणि पुन्हा हे प्रकरण कोणी उकरून काढू नये म्हणून दोन्हीही गटाकडून खुटपत्र लिहून घेतले जायचे .
कधी कधी पंचायतीसमोर दिव्यही करून दाखवावे लागे . आपलीच बाजू बरोबर हे सांगण्यासाठी देवाच्या मूर्तीवर हात ठेवून किंवा गंगाजल हातात घेऊन कबुली जबाब द्यावा लागे .काही प्रकरणात आपला खरेपणा दाखवून देण्यासाठी उकळत्या तेलात हात घालून त्यातील नाणे बाहेर काढावे लागे . खून केलेल्या आरोपीने ज्याचा खून झाला त्याच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई म्हणून ठखूनकाटठ द्यावी लागे.आणि अपराध्यास रंकोबाच्या देवळाजवळ म्हणजे आताच्या महालक्ष्मी बँकेसमोर असलेल्या अंधार कोठडीत आपले आयुष्य व्यतीत करावे लागे .
1844 पूर्वी कोल्हापूरच्या न्यायदानाची ही पद्धत होती .तत्कालीन परिस्थितीला पूरक असणारी होती.1843 साली कोल्हापूरचे कारभारी म्हणून दाजी कृष्णा पंडित आणि राज्यकारभारावर देखरेख करण्यासाठी मेजर ग्रॅहम यांची नियुक्ती झाली होती .त्याच काळात कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्याच्या कालखंडास सुरुवात झाली .माणसाच्या खरेदी विक्रीची (गुलाम )ही पद्धत कोल्हापुरात होती आणि गुलामांची खरेदी विक्री करण्याची पद्धत बंद करण्याचे हुकूम काढून ती बंद करावी लागली .दाजी कृष्णा पंडितांनी कोल्हापूर प्रांताचे करवीर ,पन्हाळा, शिरोळ , गडहिंग्लज ,भुदरगड असे सहा पेट्यात भाग पाडले. तेथे प्रत्येक पेट्यावर मामलेदार व महालक्रयांची नियुक्ती केली .मामलेदारांच्याकडे दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे अधिकार दिले . कोल्हापुरात दरमहा दोनशे रुपये पगारावर एक न्यायाधीश व पन्नास रुपये पगारावर एक कोतवाल नेमले .फौजदारी खटल्यात मामलेदारांना पन्नास रुपये दंड व तीन महिन्यापर्यंत शिक्षा देण्याचा अधिकार दिला . शहर कोतवालाच पंचवीस रुपये दंड व एक महिन्यापर्यंत शिक्षेचे अधिकार दिले .अपीलासाठी पॉलिटिकल एजंटास सत्र न्यायाधीशाचे अधिकार होते .मात्र राजा ऑफ कोल्हापूर अशा सहीने न्यायालयाचे निकाल लागत होते .
1867 साली पूर्ण अधिकाराचे जिल्हा न्यायालय कोल्हापुरात सुरू झाले व कोल्हापूर न्यायालयात महादेव गोविंद रानडे यांची पहिली न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली . 1931 साली स्वतंत्र हायकोर्ट व सुप्रीम कोर्ट स्थापन झाले. हायकोर्टासाठी तीन न्यायाधीशांचे खंडपीठ व सुप्रीम कोर्टासाठी सहा न्यायाधीशांचे खंडपीठ नेमले गेले .
कोल्हापूरच्या न्यायालयात महादेव गोविंद रानडे ,बळवंत नारायण जोशी ,गोपाळ गोविंद पाठक ,विश्वनाथ गोविंद चाळेकर ,मेहेरजी बाई कुवरजी तारापूरवाला ,कृष्णाजी नारायण पंडितराव ,विश्वनाथ बल्लाळ गोखले ,भास्करराव जाधव, राव बहादूर एबी चौगुले, विष्णू गणेश जाधव ,रघुनाथ पांडुरंग सावंत ,शंकरराव आबाजी इंदुलकर, विनायक नारायण देव, हर्षद बाई दिवा, नारायण लोकूर, ज्ञानदेव माळी गोविंद माडगावकर यांनी न्यायाधीश म्हणून न्यायदानाची परंपरा जपली.बळवंत नारायण जोशी यांच्या न्यायमूर्ती पदाच्या काळात शुक्रवार पेठेत त्यांनी दोन चौकी भव्य वाडा बांधला . हा वाडा त्यांनी सरकारी कर्ज काढून बांधला .तो वाडा निवृत्तीनंतर त्यांनी सरकारकडे जमा केला . शुक्रवार पेठेत सोमेश्वर गल्लीत हा वाडा आजही आहे . त्यात पूर्वी दिवाणी न्यायालयाचे कामकाज झाले. लोकमान्य टिळकांच्या वरील खटला याच न्यायालयात चालला . शुक्रवार वाडा या नावाने ओळखल्या जाण्राया या इमारतीत मेन राजाराम हायस्कूल व काही वेळ जिल्हा परिषदेचे विद्यानिकेतन होते . आता तेथे आरोग्य विभागाचे कार्यालय आहे . महालक्ष्मी मंदिरात हरिजनांना प्रवेश देण्याच्या चळवळीत बळवंत जोशी यांनी जाहीरपणे प्रवेश देण्यासाठी समर्थन दिले .त्यांनी एका निवाड्यात पुण्याचे जिल्हा न्यायाधीश किंकेड यांच्यावर टीका केल्यामुळे त्यांना सक्तीने निवृत्त व्हायला लागले .
कर्नल रे याच्यावर विषप्रयोग केल्याचा खटला शाहू महाराजांच्या वर दाखल होता .हा खटला विश्वनाथ बल्लाळ गोखले यांच्या पुढे चालला . व त्यांनी हा खटलाच बनावट असल्याचा निकाल दिला .ते स्वत? हातात पूजा पात्र घेऊन रोज अंबाबाई ,कपिलेश्वर ब्रह्मेश्वर या मंदिरात जात .त्यांच्यापुढे पट्टेवाला असे. उघडपणे धार्मिक विधी ते करत . एखाद्या समारंभाचे अध्यक्ष असतील तर उघडपणे समारंभातील उणिवा मांडत . त्यांचेच नाव करवीर नगर वाचन मंदिरातील सभागृहास देण्यात आले आहे .
कोल्हापूर न्यायालयात यशवंत अभ्यंकर, . वि.कु राशिंगकर, गो. कृ.सोनशी ,रा.मू .आपटे , रा.ना . पंगु ,खंडेराव बागल, स.रा .श्रीखंडे , वि .वि .जोशी ,कृ .अ. ताम्हणकर , य .जो . सोवनी, नारायण सावंत पाचलग ,इराणी ,रामभाऊ गोखले ,तात्या आपटे बापूराव श्रीखंडे ,नाना गुणे, पुसाळकर ,, हर्षे ,के आर आपटे, एम बी देशपांडे ,काशीकर ,सरलष्कर, धर्माधिकारी ,पुराणिक, श्रेष्ठी,जनार्दन नागावकर , चिंचवडकर ,देवरुखकर गणेश हरी करमरकर ,वसंतराव बागल, सखाराम पांडुरंग सावंत ,राजाराम तुकाराम बगाडे ,कृष्णाजी ताम्हणकर बापूसाहेब आडके ,भाऊराव पोतनीस नारायण रानडे यांनी आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला.
जिल्हा न्यायालयाची म्हणजे आत्ताच्या सीपीआर समोरची इमारत 1874 साली .बांधण्यात आली .4200चौरस फूट क्षेत्रावर न्यायालयाचा परिसर आहे .मुख्य न्यायदानकक्ष 45 फूट लांब व 45 फूट उंचीचा मनोरा आहे .मन्रोयासाठी लाकडी कमानीची वेगळी गुंफण आहे या दालनात आवाज घुमत नाही .न्यायालयात चालण्राया कामकाजातला प्रत्येक शब्द शेवटपर्यंत ऐकता यावा या अंगाने या दालनाची रचना आहे.जिल्हा न्यायालयाची नवीन इमारत झाल्यामुळे गेली कित्येक वर्ष हे मूळ न्यायालय बंद अवस्थेतच होते.पण काळाचा महिमा कसा असतो बघा याच मूळ इमारतीत आता कोल्हापूर खंडपीठाचे कामकाज चालणार आहे.
- महादेव गोविंद रानडे पहिले न्यायाधीश…
संस्थान काळात कोल्हापूर न्यायालयाचे पहिले न्यायमूर्ती म्हणून महादेव गोविंद रानडे यांनी काम पाहिले. ते उत्तरेश्वर महादेव मंदिराचेभक्त होते .त्यांनी या मंदिराच्या विकास कामास हातभार लावला होता .रानडे यांच्या नावाने असलेली नगरपालिकेची शाळा आज ही उत्तरेश्वर मंदिरासमोर आहे .पण ती बंद आहे .
- पहिले न्यायालय शुक्रवार पेठेत
न्यायालयाची बळवंत नारायण जोशी यांची ही इमारत त्यांनी सरकारी कर्ज काढून बांधली होती . निवृत्तीनंतर त्यांनी ही इमारत सरकारला दान केली . या इमारतीत मेन राजाराम हायस्कूल व विद्यानिकेतन भरत होते .अलीकडे तेथे आरोग्य विभागाचे कार्यालय आहे . वाडा अजूनही जसा आहे तसा आहे .








