प्रतिनिधी/खंडाळा
वन्यप्राण्यांसाठी डोंगर रांगामध्ये पाणवठ्याची सोय व्हावी, यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने खंडाळा तालुक्यातील घाटदरे येथील वनविभागाच्या हाद्दीत वनराई बंधारा बांधून वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्हरेश्र्वर डोंगरांगेच्या कुशीत वसलेल्या घाटदरे गावाजवळ असणाऱ्या वनविभागाच्या कार्यक्षेत्रात वनविभाग खंडाळा व गावकऱ्यांच्या मदतीने श्रमदाने वनराई बंधारा साकारला आहे. डोंगररांगामधून काही जंगली प्राण्यांचा अधिवास असून त्यांची तहान भागविण्यासाठी डोंगरातून येणाऱ्या ओढ्यावर पाणवठा तयार करण्याचा संकल्प करण्यात आला. नैसर्गिक श्रोत रिकामे करून वाळू व मातीने भरलेली सिमेंटची पोती, दगड रचून गावकऱ्यांनी वनराई बंधारा उभारलाय.
यावेळी वनरक्षक प्रकाश शिंदे , बाळासाहेब बिचुकले ,गणेश बोडरे,महेश शिंतोले , दशरथ धायगुडे, गोरखनाथ गायकवाड, आदी गावकरी उपस्थित होते.
पर्यावरण समतोल राखला जावा, वन्य जीवांचे रक्षण व्हावे. यासाठी कामाच्या कार्यक्षेत्रातील गावा – गावात, शाळा – महाविद्यालयात प्रबोधनपर माहीती देत वनरक्षक प्रकाश शिंदे गेली अनेक वर्षे उत्कृष्ट काम करित आहेत. वनविभागाच्या विविध योजना जनतेपर्यत पोहचवण्यासाठी कायम अग्रेसर असतात. वनविभाग व घाटदरे येथील गावकऱ्यांच्या मदतीने वनराई बंधारा साकारण्यात आला. वन्यप्राण्यांच्या पाण्याची सोय झाली. भविष्यात साताऱ्याचे उपवन संरक्षक एम .एन मोहीते,रोजगार हमी योजना – वन्यजीव विभागाच्या सहायक वनसंरक्षक आर.ए. व्होरकाटे व खंडाळ्याच्या वनक्षेत्रपाल प्रियांका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनराई बंधारे साकारण्याचे काम हाती घेतले आहे. – जी.पा. ढोले वनपाल,लोणंद









