वार्ताहर /कडोली
विजांच्या कडकडाटांसह कडोली, केदनूर परिसरात वळीव पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली असून बहुतांशी शेतकऱ्यांचा कडबा पावसात सापडल्याने नुकसान झाले आहे. सध्या कडोली परिसरात वाळलेले गवत गावाकडे आणण्याचे काम करीत आहे. त्यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांच्या अपूर्णावस्थेत असलेल्या गवतगंज्या या पावसात सापडल्या. परिणामी ताडपत्री, प्लास्टिक कागदांची जमवाजमव करून गवतगंज्या झाकण्यासाठी शेतकऱ्यांची एकच धावपळ दिसून येत होती. केदनूर, मण्णीकेरी, बंबरगा परिसरात सर्व शेतकऱ्यांनी कडबा कापून टाकला आहे. सदर कडबा पावसात सापडल्याने शेतकऱ्यांत निराशा दिसून येत आहे.









