क्रीडा प्रतिनिधी/ मडगांव
यजमान गोव्याला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील कबड्डीमध्ये पहिल्या दिवशी संमिश्र यश प्राप्त झाले. कालपासून कबड्डी क्रीडा प्रकारातील पुरूष व महिला स्पर्धेला सुरूवात झाली.
गोव्याच्या महिला संघाने लीगमध्ये दमदार प्रारंभ करताना आपला पहिला सामना सहज जिंकला. गोव्याच्या महिला संघाने झारखंडवर 43-23 अशा 20 गुणांच्या फरकाने मात केली. प्रशिक्षक ओंकार गावसचे प्रशिक्षण लाभलेल्या गोव्यासाठी यश्मिता तळवडकर, अंकिता म्हार्दोळकरने या सामन्यात आपली छाप पाडताना चांगल्या दमदार चढाया केल्या तर अलिशा अकारकर व मनिषाने चांगला बचाव केला.
गोव्याच्या पुरूष संघाने मात्र निराशा केली व त्यांना लीगमधील पहिल्या लढतीत पराभव स्वीकारावा लागला. उत्तरप्रदेशच्या तगड्या कब•ाrपटूंसमोर गोव्याचा निभाव लागला नाही व त्यांना 60-31 असा दारूण पराभव स्वीकारावा लागला. गोव्याचा कप्तान नेहाल सावळ देसाई वगळत अन्य गोव्याचे खेळाडू सपशेल अपयशी ठरले. आता गोव्याच्या महिलांचा दुसरा लीग सामना बलाढ्या हरियाणाशी तर पुरूष संघाचा सामना सेनादलशी आज रविवारी होणार आहे.









