वृत्तसंस्था/ पानिपत
हरियाणाच्या पानिपत येथील पोलीस उपअधीक्षक जोगिंदर देसवाल यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. घरानजीकच्या जिममध्ये सोमवारी सकाळी एक्सरसाइज करताना हृदयविकारचा धक्का बसल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. 50 वर्षीय जोगिंदर हे सोमवारी सकाळी घरातून जिममध्ये व्यायाम करण्यासाठी बाहेर पडले होते. सकाळी साडेपाचच्या सुमारास त्यांना छातीत वेदना सुरू झाल्या होत्या. आसपासच्या लोकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले, जेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. जोगिंदर हे मूळचे झज्जरचे रहिवासी होते.नवरात्रोत्सवात गरबा नृत्य करताना आतापर्यंत 12 हून अधिक जणांचा हृदयविकाराचा धक्का बसून मृत्यू झाल्याचेही वृत्त आहे.









