कबनुर वार्ताहर
जिल्हा परिषद कार्यालय समोर नवीन राष्ट्रीय पेजल योजनेस विजेची व्यवस्था करावी या मागणीसाठी गेली चार दिवस झाले आमरण उपोषण सुरू आहे. पालकमंत्री महाराष्ट्र राज्य वीज वितरण सीएमडी यांची दहा मार्च रोजी मंत्रालयात बैठक आयोजित केली असून यामध्ये निर्णय घेतले जाईल अशी ग्वाही खासदार आमदार व पदाधिकाऱ्यांनी दिल्यामुळे येथे सुरू असलेल्या आमरण उपोषण 10 मार्च पर्यंत स्थगित करण्यात आले असल्याची घोषणा सरपंच राजेश पाटील यांनी केली.
हातकणंगले तालुक्यातील तीळवणी येथे राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम पूर्ण झाले गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी गेली दीड वर्षे झालेवीज वितरण कंपनीकडून विद्युत व्यवस्था करावी अशी मागणी केली होती. परंतु वीज कंपनीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चौदा गाव योजनेचे मागील थकबाकी असल्याचे कारण पुढे करून हे वीज भरल्याशिवाय वीज कनेक्शन देता येणार नसल्याचे कारण पुढे केले. महावितरण कंपनीला वस्तुस्थिती सांगितली होती सकारात्मक मार्क काढू असे त्यांनी सांगितले होते पण अद्यापही महावितरणने काही हालचाली केल्या नाहीत. तेव्हा या योजनेसाठी विद्युत वितरण कंपनीकडून विजेची व्यवस्था करावी या मागणीसाठी ना इलाजास्तव गावकऱ्यांना हा पवित्र घ्यावा लागला. एक मार्चपासून जिल्हा परिषद कार्यालय समोर सरपंच राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांचे आमरण उपोषण सुरू आहे
आजच्या चौथ्या दिवशी भागाचे खासदार धर्यशील माने आमदार राजु बाबा आवळे, माजी आमदार राजीव आवळे ,मा जि परिषद सदस्य अशोकराव माने,मा माणगाव सरपंच राजु मगदुम,साजणी ग्रा पं सदस्य आप्पा पाटील.व गावतील प्रमुख व्यक्ती यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन माहिती घेतली. चर्चेअंती उपस्थित मान्यवरांच्या शब्दाला मान देऊन 1मार्च पासुन चालु असलेले अमरण उपोषण आज सर्व गावातील नागरिकांच्या समवेत 10 मार्च पर्यत स्थगित करत आहोत असे जाहीर केले.
10 मार्च रोजी मुबंई मंत्रालय येथे कोल्हापुरचे पालकमंत्री व महावितरण CMD यांच्या समवेत बैठक आयोजित केलेली आहे यातुन ते मार्ग काढून आपल्या गावाला नविन वीज कनेक्शन जोडणी करुन देण्यासाठी बैठक आयोजित केले आहे. पाणी फिल्टर चे वीज कनेक्शन जोडणी खर्च चे 9 लाख 50 हजार तात्काळ DPDC तुन देण्यात येण्याची व्यवस्था केली जाईल अशी माहिती अशोकराव माने व राजु मगदुम यांनी दिली. उपोषणामुळे 90% काम पूर्ण झालेले आहे.