म्हसवड :
पाणी, चारा, रोजगार यांचा वर्षानुवर्षांचा दुष्काळ पाचवीला पूजलेल्या माण तालुक्यात आजपर्यंतच्या इतिहासात मे महिना पाणी, चारा, कडक उन्हामुळे माणवासियांची कमालीची तगमग व्हायची. पाणीटंचाई दूर व्हावी यासाठी माणसांना व जनावरांना दीडशेच्या वर टँकरने पाणीपुरवठा मे महिन्यात होत असतो. त्या मे महिन्याचे गणितच अवकाळीने चदलून टाकले. मान्सूनपूर्व पावसाने अॅडव्हान्समध्ये रौद्ररूप घेत दाणादाण उडवली. यामध्ये शेकडो हेक्टर क्षेत्रातील कांदा, मकवान, भुईमूग, उसासह १२० पराची पडझड, लाखो रुपयांच्या आंब्याचा सडा पडल्याने म्हसवडसह माण तालुक्यातील कोटावयी रुपयांचे नुकसान झाल्याने शेतकयांच्या स्वप्नांचा चिखल झाला आहे. प्रशासनाच्या वतीने दोन दिवसापासून पंचनामे सुरू असून पाणी असल्याने पंचनामे करण्यास अडथळा येत आहे.
अवकाळी पावसाने माणच्या इतिहासात मे महिन्यात तालुक्यातील एकमेव माणगंगा नदी, नाले, ओढे, तलाब, बंधारे भरून वाहण्याची पहिलीच वेळ आहे, ज्या माण तालुक्यात संपूर्ण पावसाळ्यात अवघा ४५० मिलिमीटर पाऊस पडतो, त्या दुष्काळी माणमध्ये मे महिन्यातच २०० मिलिमीटरची सीमा ओलांडून आठ दिवसांतच निम्मा पाऊस झाला आहे. अजून मान्सूनचा पाऊस पुढील महिन्यात येणार आहे. तोपर्यंत अवकाळीने पातलेल्या धुमाकुळामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचे मोठे नुकसान झाले. आन पर्यंत ७० हेक्टर क्षेत्राचे पंचनामे झाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने ऊस, कांदा, भुईमूग, मकवान, कडवाळ याचे नुकसान झाले. तर आठ दिवसांपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील अनेक घरे पडली असल्याने हक्काचा निवाराच उरला नाही. अनेकांनी प्लास्टिक कागद लावून निवारा केला आहे. दोन दिवसांमध्ये महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी वोन दिवसांपासून पडलेल्या घराचे पंचनामे सुरू केले असून आजपर्यंत १२० पडघराचे पंचनामे झाले आहेत. माणगंगा नदीलगत असलेली दहिवडी परिसरातील एका कुटुंबातील सात लोकांना या पूरपरिस्थितीचा बोका निर्माण झाला होता. त्या कुटुंबास सुरक्षितस्थळी ठेवण्यात आले, तर पळशी येथील बार कुटुंबातील २२ जणांची महसूल प्रशासनाने शाळेमध्ये व्यवस्था केली आहे, म्हसवड विश्रामगृहानजीक असलेल्या बंधायालगत चार मोलमजुरी करणारी कुटुंबे राहतात. त्यातील १४ जणांचे स्थलांतर करून त्यांची सोय सिद्धनाथ हायस्कूलमध्ये करण्यात आली आहे. यासाठी प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, तहसीलवार विकास आहेर, विकास ठोंबरे, मुख्याधिकारी सचिन माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, तलाठी, कर्मचारी यांनी रविवारी व सोमवारी दौन दिवस सतत पडत असलेल्या पावसाची तमा न बाळगता कर्तव्य म्हणून काम केल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

तालुक्यातील १५ पुलांवरून पाणी गेले तर अनेक पूल पाण्याच्या प्रवाहाने पडल्याने अनेक गावांचा दोन दिवसांपासून संपर्क तुटला होता. सोमबारपासून बांधकाम विभागाने तातडीने तात्पुतीं अनेक ठिकाणी या जाण्यासाठी नागरिकांची व्यवस्था केली.
- उपाययोजनांबाबत प्रशासनाची तयारी…
गेल्या पाच दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत तहसीलदार, तलाठी, सर्कल यांना पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या असून, दोन दिवसांपासून पंचनामे सुरु आहेत. मंगळवारपर्यंत ६० ते ६५ हेक्टर क्षेत्राचे नुकसानीचे पंचनामे आले आहेत. पडझड झालेल्या १२० घरांचे पंचनामे झाले असून उर्वरित पंचनामे सुरू आहेत. पुराच्या पाण्यामुळे धोका निर्माण होणारे दहिवडी येथील एक, पळशी येथील चार तर म्हसवड येथील चार कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे. म्हसवड पालिका, माण पंचायत समिती, नगरपंचायत, दहिवडी पोलीस स्टेशन, म्हसवड पोलीस स्टेशन यांना सतर्कता बाळगण्यायायत सूचना करण्यात आली आहे. अचानक धोकादायक परिस्थिती उद्भवली तर उपाययोजनांबाबतही प्रशासनाने तयारी केली आहे.
– उज्ज्वला गाडेकर, प्रांताधिकारी
- ऊस व मकवान दोन विवसांपासून पाण्यात
आठ दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतातील मकवान व ऊस पिके पाण्यात असल्याने त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्यामुळे मकवान झोपले आहे, तर ऊस पिकाचेही पाण्यात असल्याने मोठे नुकसान होणार आहे. महसूल विभागाने तातडीने पंचनामे करून मदत करावी.
-कैलास भोरे
- लाखो रुपयांचा आंबा पाण्यात
अवकाळीने आंबा पिकाचे सर्वांत जास्त मोठे नुकसान झाले आहे. आता कुठे आंबा बाजारात आला असताना अवकाळीने शेतकयांचे होत्याचे नव्हते करून टाकले. आठ दिवस वादळी वाऱ्याने झाडांचे आंबे मोठ्या प्रमाणात पडून आंब्याचा सडा पडला होता. त्यात पाऊस झाल्याने पडलेले आंबे पाण्यावर तरंगत होते. अवकाळी पावसाने लाखो रुपयांचे नुकसान झाले असून महसूल विभागाने तातडीने पंचनामे करावेत,
– बाळासाहेब माने, शेतकरी








