दोडामार्ग – वार्ताहर
महसूल विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘महसूल सप्ताह’ या विशेष उपक्रमाच्या निमित्ताने प्रभारी तहसीलदार प्रज्ञा राजमाने यांचा जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.हा कार्यक्रम जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. महसूल सप्ताहाच्या निमित्ताने जिल्ह्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रभारी तहसीलदार प्रज्ञा राजमाने यांनी आपल्या कार्यकाळात महसूल प्रशासनाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्यामुळे त्यांची निवड सत्कारासाठी करण्यात आली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, अप्पर पोलिस अधिक्षक नयोमी साठम उपस्थित होते.









