114 लोकांवर गुन्हा दाखल, 15 जखमी
जत, प्रतिनिधी
जत तालुक्यातील अक्कळवाडी येथे पालखी मिरवणूकीच्या कारणातून दोन गटात चाकु,लोखंडी रॉड, काठी, दगडाच्या साहाय्याने तुंबळ हाणामारीची घटना घडली आहे. यामध्ये पंधरा जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवार दि. 5 मे रोजी रात्री 8.45 वाजण्याच्या सुमारास घडली.या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीत सरपंच, उपसरपंच यांच्यासह दोन्ही बाजूच्या 114 जनावर उमदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यात बारा ते पंधरा जण गंभीर जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.
घटना समजताच प्रभारी उप विभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे, जतचे पोलिस निरीक्षक राजेश रामागरे, उमदीचे सहायक पोलिस निरीक्षक पंकज पवार यांनी संपूर्ण फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, या घटनेनंतर गावात मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रात्री उशिरा ज्यादा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
यामध्ये रविकुमार मलकाप्पा हलसंगी (वय 32) याने दिलेल्या फिर्यादीत इस्ताकअली बालगाव, सद्दाम इनामदार, लतीब इनामदार, रजाक बालगाव, पैंगबर बालगाव, अल्लमबाशा बालगाव, बादशाह कोतवाल, जब्बार इनामदार, मेहबुब बालगाव, मेहबुब इनामदार, सद्दाम शेख, दावलसाब इनामदार, गुलाब इनामदार, तकदीर वालीकर, लालसाब बालगाव, चांदसाब इनामदार, लालसाब मुलानी-शेख, सलीम मुल्ला, नजीरसाब इनामदार व अनोळखी 30 लोकांवर गुन्हा दाखल केला आहे.
तर दुसऱ्या गटाच्या बाजूंनी नजीरसाब बंदगीसाब इनामदार (वय 48) यांनी दिलेल्या फिर्यादीत सरपंच शिवानंद मलाबादी, उपसरपंच सुनिल शेजाळे, रेवनसिध्द पाटील, श्रीशैल मलाबादी, विश्वनाथ मलाबादी, मंजुनाथ मलाबादी, काथीनाथ मलाबादी, निळकंठ शेजाळे, मल्लिकार्जुन शेजाळ, अमित पाटील, मल्लिकार्जुन हलसंगी, रवीकुमार हलसंगी, श्रीशैल हलसंगी, मलकाप्पा हलसंगी, कराप्पा हलसंगी, अजित मलाबादी, गजानन मलाबादी, यशवंत मलाबादी, शेखर मलाबादी, अनिल सोनगी, सुनिल सोनगी, सतिश सोनगी, प्रदिप मलाबादी, धै-याप्पा मलगोंडा, सिद्राया मलगोंडा व अनोळखी ४० लोक सर्व रा. अक्कळवाडी ता. जत यांच्यावर 307 कलमांसह गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास उमदीचे सहायक पोलिस निरीक्षक पंकज पवार करत आहेत.
तीन दिवस पोलीस कोठडी
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी 15 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.








