आचरा प्रतिनिधी
कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख, भाजपा नेते निलेश राणे यांनी बुधवारी मोदी @९ अभियान अंतर्गत मालवण तालुक्यातील आचरा भागातील शक्तिकेंद्र प्रमुखांच्या भेटी घेतल्या. भर पावसातच निलेश राणे यांचा दौरा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढविणारा ठरला.आचरा येथे अभिजित सावंत यांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीत संघटनात्मक चर्चा तसेच मतदारसंघात सुरू असलेल्या घरो घरी संपर्क अभियानाचा आढावा घेण्यात आला. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ 9090902024 या नंबरवर मिस्ड कॉल देत समर्थन देण्याचे आवाहन निलेश राणे यांनी केले आहे. तसेच ९ वर्षातील केलेल्या कामांची माहिती त्यांनी यावेळी दिली.
यावेळी रामेश्वर विकास सोसायटीची जिल्हा बँकेकडून देण्यात येणारी वीस हजार कर्ज मर्यादा वाढवून पन्नास हजार करण्याची मागणी डॉ कोळंबकर यांनी केली. याबाबत निलेश राणे यांनी तातडीने जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्याशी फोनवरून संपर्क साधत खासबाब म्हणून यात लक्ष देण्यास सांगितले. यावेळी अशोक सावंत,धोंडू चिंदरकर, बाबा परब,राजन गांवकर,जेरान फर्नांडिस, संतोष कोदे, अरविंद सावंत, जयप्रकाश परुळेकर, शक्ती केंद्र प्रमुख अभिजित सावंत, बाबू कदम, वामन आचरेकर, लवू मालंडकर, मुझफ्फर मुजावर,संतोष मिराशी, अवधूत हळदणकर, सिद्धार्थ कोळगे, गांवकर यांसह अन्य ग्रामस्थ आदी उपस्थित होते.









