वृत्तसंस्था/ हैदराबाद
माजी आमदार राजगोपाळ रेड्डी यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. रेड्डी हे पुन्हा काँग्रेसमध्ये सामील होणार आहेत. राजगोपाळ यांनी अलिकडेच पार पडलेल्या मुनुगोडे विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक लढविली होती, ज्यात ते पराभूत झाले होते. तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जारी करण्यात आलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत राजगोपाळ रे•ाr यांचे नाव सामील नवहते. राजगोपाळ हे भोंगिरचे काँग्रेस खासदार वेंकट रेड्डी यांचे कनिष्ठ बंधू आहेत. मागील वर्षी ऑगस्टमध्ये त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत भाजपमध्ये प्रवेश केला होता.
राजगोपाळ हे शुक्रवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पक्षात सामील होऊ शकतात. काँग्रेसचे नेते पक्षात पुन्हा सामील करण्याचे आवाहन करत होते असा दावा रेड्डी यांनी केला आहे. मुनुगोडे मतदारसंघातील पोटनिवडणुकीत रेड्डी यांना बीआरएसचे उमेदवार प्रभाकर रेड्डी यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. राजगोपाळ यांनी मागील काही काळापासून भाजपच्या कार्यक्रमांपासून अंतर राखले होते.









