In a balanced Shiv Jayanti spirit; Organized by Swarajya Group
शिवजयंतीच्या निमित्ताने सातुळी सारख्या ग्रामीण गावात स्वराज्य ग्रुपने आयोजित केलेले विविध उपक्रम कौतुकास्पद आहेत. मंडळाच्या या समजपयोगी उपक्रमासाठी यापुढे सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही चौकुळ येथील सामजिक युवा कार्यकर्ते दिनेश गावडे यांनी दिली.
सातुळी गावातील स्वराज्य ग्रुपने शिवजयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर सावंतवाडीच्या माजी नगराध्यक्ष सौ. अन्नपुर्णा कोरगावकर, सौ. सुप्रिया गावडे, सरपंच सोनाली परब, विभावरी सुकी, उपसरपंच स्वप्निल परब, कु. योगिता बुराण, शाखा प्रमुख शशिकांत गावडे, माजी सरपंच उत्तम परब, सातुळी पोलीस पाटील अरुण परब,
बावळाट पोलिस पाटील आबा परब, सौ. रश्मी सावंत, भास्कर परब, अभय मालवणकर, सुरेश कदम, संदीप सुकी, मदन परब, सौ. रक्षंदा परब, अनिल सावंत, आणि स्वराज्य ग्रुप सर्व सदस्य उपस्थित होते.
यावेळी दिनेश गावडे यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर त्यांनी गावातील युवक, ग्रामस्थ व महिलांना मार्गदर्शन केले. त्यानंतर शिव प्रतिमेची भव्य सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यानिमित्त महिला लेझीम पथकाने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. यात गावातील महिलांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला.यावेळी खेळ पैठणीचा कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.यावेळी खेळ पठाणी मधील प्रथम पाच महिला पैठणी वितरण करण्यात आल्या.तसेच रेकॉर्ड डान्सच्या बहारदार नृत्याने उपस्थिताना मोहिनी घातली. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्याहस्ते गौरव करण्यात आला..त्यानंतर दाणोली माध्यमिक विद्यालयाच्या लेझिम पथकाच्या कार्यक्रमाने सांगता झाली.
ओटवणे प्रतिनिधी









