वृत्तसंस्था /नवी दिल्ली
2023 मध्ये पाहता 33 समभागांनी गुंतवणूकदारांना आतापर्यंत दुप्पट लाभ दिला असल्याची माहिती आहे. पहिल्या सहा महिन्यात एस अँड पी बीएसई सेन्सेक्स 3.5 टक्के इतका वाढला आहे. 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त बाजार भांडवलमूल्य असणाऱ्या दुप्पट लाभाच्या कंपन्यांचा यात समावेश आहे. 33 पैकी 6 समभाग कॅपिटल गुडस् आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी निर्देशांकातील आहेत. लार्ज कॅप आयटी कंपन्यांचे समभाग मात्र दबावात होते. स्मॉल कॅप व मिडकॅप कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी अधिक गुंतवणूक केल्याचे पाहायला मिळाले. केन्स टेक्नॉलॉजीच्या समभागाने नोव्हेंबर 2022 मध्ये बाजारात पदार्पण केले होते. ज्याने गुंतवणूकदारांना वर्षभरातच दुप्पट लाभ मिळवून दिला. न्यूक्लीयस सॉफ्टवेअर एक्स्पोर्टसचा समभाग 172 टक्के तेजीत राहिला तर ओरीयन प्रो तर तिप्पट लाभ मिळवून देणारा समभाग ठरला. पीएलआयसारख्या प्रोत्सहनात्मक सरकारच्या योजनेमुळे कॅपिटल गुडस् क्षेत्रातल्या कंपन्यांनी उत्तम विकास साधला. आणि परिणामी त्यांच्या समभागांनीही बाजारात तेजी राखत गुंतवणूकदारांना मालामाल केले. कॅपिटल गुडस् निर्देशांक 18 टक्के इतका वाढला आहे. डॉ. नोरा इंडिया, इंटेग्रा इंजिनियरिंग, डब्ल्यूपीआयएल लिमिटेड व मोल्ड टेक टेक्नॉलॉजीस यांनीही गुंतवणूकदारांना यंदा मालामाल केलंय! तितागढ रेल सिस्टम्सचा समभागही यंदा दमदार कामगिरी करू शकला आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीचा नफा, महसूल दोन्हीही दुप्पट झाला आहे.
निवडक कंपन्या पाहुया
- कंपनी गुंतवणूक लाभ
- रेमेडियम लाइफकेअर 2573 टक्के लाभ
- आंध्रा सिमेंटस् 1392 टक्के लाभ
- के अँड रेल इंजिनियरिंग 689 टक्के
- सूर्यलता स्पिनिंग मिल्स 310 टक्के
- जेआयटीएफ इन्फ्रालॉजिस्टीक्स 271 टक्के
- ओरीयन प्रो सोल्यूशन्स 200 टक्के
- इएफसी 175 टक्के









