नवी दिल्ली
भारताच्या ऑगस्टमधील पाम तेलाच्या आयातीत जवळपास 87 टक्के इतकी वाढ झाली असल्याचे दिसले आहे. ऑगस्टमध्ये 9,94,997 टन इतक्या पाम तेलाची आयात करण्यात आली असल्याची माहिती सॉल्वंट एक्सट्रक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया यांनी दिली आहे. याआधी जुलैमध्ये 5,30,420 टन इतक्या पाम तेलाची आयात भारताने केली होती. सवलतीत तेल मिळत असल्याने मोठय़ा प्रमाणात तेलाची आयात करण्यात आल्याचे सांगितले जाते. इंडोनेशियातून भारत मोठय़ा प्रमाणात पाम तेल घेतो.









