वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑगस्ट महिन्यापर्यंत एकूण खाद्य तेलाच्या आयातीमध्ये 24 टक्के वाढ दर्शविलेली आहे. या तेल वर्षामध्ये खाद्यतेलाची आयात विक्रमी स्तरावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ऑगस्ट महिन्यामध्ये विक्रमी स्तरावरती खाद्यतेलाची आयात केली गेली आहे. वर्षाच्या आधारावर पाहता निव्वळ ऑगस्टमध्ये खाद्यतेलाची आयात 33 टक्के अधिक नोंदली गेली आहे. ऑगस्टपर्यंतच्या एकूण खाद्यतेलाच्या आयातीमध्ये मात्र 24 टक्के वाढ दर्शवली गेली आहे.
किती टन आयात
18.66 लाख टन खाद्य तेलाची आयात ऑगस्टमध्ये करण्यात आली आहे. ऑक्टोबरमध्ये संपणाऱ्या वर्षामध्ये 160 ते 165 लाख टन खाद्यतेलाची आयात होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. असे जर झाल्यास ही विक्रमी स्तरावरची खाद्यतेलाची आयात मानली जाणार आहे. यापूर्वी तशी पाहिल्यास सर्वाधिक 2016-2017 वर्षात खाद्यतेलाची आयात 151 लाख टन इतकी केली गेली होती.









