राज्य शासनाकडून चाचपणी सुरू ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय जाहीर करणार
मालवण / प्रतिनिधी
मत्स्यव्यवसाय क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी तसेच महाराष्ट्राला मत्स्य उत्पादनात प्रथम क्रमांक वर आणण्यासाठी महाराष्ट्र सरकार क्रांतिकारी निर्णय घेणार आहे.सदर बहुचर्चित निर्णयामुळे किनारपट्टीवरील लाखो मच्छीमार यांना फायदा होणार आहे.तसेच गोड्या व खाऱ्या पाण्यातील मत्स्य शेतकरी आणि मत्स्यव्यवसायिक यांना मोठा दिलासा मिळणार आहे.सदर निर्णया बाबत लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.









