वृद्ध आईने ट्रायसायकलने केला 170 किमी प्रवास
ज्या वयात कुठल्याही आसऱ्याशिवाय नीट उभे राहता येत नाही, अशा वयात एक वृद्ध महिला ट्रायसिकल घेऊन स्वत:च्या मुलीला भेटण्यासाठी 170 किलोमीटर अंतरावर पोहोचली आहे. राजगढ जिल्ह्यातील महामार्गादरम्यान या महिलेचा या कठिण प्रवासाची व्यथा कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ ‘नात्यांचे महत्त्व’ या नावाने पोस्ट करण्यात आला आहे
या दिव्यांग महिलेकडे बसचे तिकीट काढण्यासाठी पैसे नव्हते, मग तिने ट्रायसिकलने प्रवास केला आहे. 8 दिवसात तिने 170 किलोमीटरचे अंतर कापून मुलीची भेट घेतली आहे. वृद्धत्वात ट्रायसिकलने प्रवास करणे सोपे काम नाही. या प्रवासादरम्यान या महिलेला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. स्वत:च्या मुलीपर्यंत पोहोचण्यासाठी या महिलेला 8 दिवसांपर्यंत प्रवास करावा लागला.

बसवाहकाने दिला होता नकार
ही घटना मध्यप्रदेशच्या गुना जिल्ह्यात घडली आहे. येथील अशोकनगरमध्ये राहणाऱ्या लीबियाबाई (वृद्ध महिला) यांची एक मानसकन्या राजगढ जिल्ह्यातील उदनखेडी गावात राहते. वृद्ध महिलेला अनेक दिवसांपासून स्वत:च्या मुलीची आठवण येत होती, परंतु तिच्याकडे बसचे तिकीट काढण्यासाठी पैसे नव्हते. तिने अनेक बस कर्मचाऱ्यांना स्वत:ची व्यथा सांगितली, परंतु कुणीच तिला प्रवास करू दिला नाही. अशा स्थितीत तिने स्वत:च्या ट्रायसायकलद्वारेच 170 किलोमीटर अंतरावरील मुलीकडे जाण्याचा निर्णय घेतला.
लोक झाले भावुक
हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर शेअर करण्यात येत आहे. यात वृद्ध महिला स्वत:च्या हातान ट्रायसायकल खेचताना दिसून येते. या ट्रायसायकलवर मोठे सामान लादले होते.









