पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांची माहिती
प्रतिनिधी /म्हापसा
राज्याचा पर्यटन कायदा तयार आहे. मात्र प्रशासन योग्यरित्या चालीस लावून सर्व गोष्टी व्यवस्थित जागेवर घालूनच या कायद्याची अंमलबाजवणी करण्यात येईल, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी काल मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
पर्यटन कायदा तयार केला पण, त्याचे पुढे काय? असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला असता मंत्र्यांनी वरील माहिती दिली.
पर्यटन क्षेत्राला एका उच्च पातळीवर नेणारा दृष्टीकोन ठेवूनच आम्ही पुढे जाणार आहोत. आम्ही जे सांगतिले वा वचने दिली आहेत ती पूर्णत्वाकडे नेण्यास आम्ही ठोस पावले उचलत आहोत. ‘सन, सेंड आणि सिन’ याबाबत आम्ही काही बोललो आहोत, ते पूर्णत्वाकडे नेण्यास आम्ही प्रयत्नरत आहोत, असे ते म्हणाले.
राज्यात हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे ही चांगली गोष्ट आहे. ही सेवा पर्यटनाच्या अंगाने पाहिल्यास ती योग्यच म्हणावी लागेल. जेथे पर्यटकांना चांगल्या सुविधा मिळतात त्या चांगल्याच म्हणाव्या लागेल, असेही मंत्री म्हणाले.
महागाई वाढली आणि उतरलीही…
महागाई एका बाजूने जेवढी वाढली आहे तेवढी दुसऱया बाजूने उतरलीही आहे. महागाई उतरली याबाबत पत्रकारांनी विचारल्यास बरे झाले असते. सर्व गोष्टीमध्ये जी वाढ होते त्यामध्ये ‘इकॉनॉमी’ असते. ज्या ठिकाणी डय़ुटी जेवढय़ा वाढल्या त्या उतरल्याही आहेत. किमती उतरल्यावरही पत्रकारांनी प्रश्न विचारला तर त्याचे स्वागत करतो. सर्वसामान्य माणसाला मदत करण्यासाठी सरकारला काही विशिष्ट पावले उचलावी लागतात. आम्ही तळागाळातील माणसे आहोत. आम्ही बोलत नाही तर करून दाखवितो, असे मंत्री रोहन खंवटे म्हणाले.









