प्रवीण देसाई,कोल्हापूर
सातबारा आणि शहरी भागातील मिळकत पत्रिका यांच्या 22 भाषांमध्ये अंमलबजावणीला सुऊवात झाली आहे. इंग्रजी, हिंदी, उर्दु, संस्कृत, कन्नड, मल्याळम, सिंधी, काश्मिरी आदी भाषांचा यामध्ये समावेश आहे. विविध भाषांमधील हे सातबारा व प्रॉपर्टी कार्डची प्रिंट काढून शासकिय कामांमध्ये वापर करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार संगणकीकृत सातबारा व शहरी भागातील मिळकत पत्रिका आता 22 भाषेत करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने याची अंमलबजावणी सुऊ केली आहे. हे सातबारा व मिळकत पत्रिका 22 भाषांमध्ये भूलेख या लिंकवर महाभूमी पोर्टलवर उपलब्ध झाला आहे. ही सुवधा राष्ट्रीय सुचना वज्ञान केंद्र (एनआयसी) ने विकसित केली आहे. सातबारा इतर भाषांमध्ये पाहण्यासाठी उपलब्ध व्हावा, यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांना निर्देश दिले होते. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने हे पाऊल उचलून अंमलबजावणी सुऊ केली आहे. त्याचा लाभ बहुतांश ा†बगर मराठी भा†षकांना होणार आहे. ऑनलाईनद्वारे सातबारा व प्रॉपर्टी कार्डचा मिळकत क्रमांक निवडल्यानंतर त्याच्याखालील कॉलममधील भाषा निवडण्याचा पर्याय दिला आहे. त्यानंतर हा सातबारा किंवा प्रॉपर्टी कार्ड डाऊनलोड करता येऊ शकते.
शासकिय कार्यालयांमध्ये विविध भाषांमधील सातबारा व प्रॉपर्टी कार्डचा उपयोग होणार आहे. तसेच उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय येथे प्रॉपर्टी कार्ड पूर्वी इंग्रजीमध्ये भाषांतरीत कऊन घेतले जात होते. परंतु आता या सुविधेमुळे थेट इंग्रजी भाषेत प्रॉपर्टी कार्ड मिळविणे सोपे झाले आहे.
….या भाषांमध्ये सातबारा
आता मराठी शिवाय इंग्रजी, हिंदी, उर्दू, संस्कृत, ओाडिसी, तमिळ, तेलगु मल्याळम, बंगाली, गुजराती, पंजाबी, कन्नड, आसामी, मणिपुरी, नेपाळी, कोकणी, डोगरी, बोडो, संथाली, सिंधी, काश्मिरी (देवनागरी) व काश्मिरी ( परसो अराबिक) या भाषांमध्ये सातबारा पाहायला मिळणार आहे.
केंद्र व राज्य सरकारने 22 भाषांमध्ये सातबारा व प्रॉपर्टी कार्डची सुविधा उपलब्ध कऊन दिली आहे. त्याची आता जिह्यासह संपूर्ण राज्यभर अंमलबजवाणीही सुऊ झाली आहे. यामुळे नागरिकांची सोय होणार आहे.
-किरण माने, शहर अधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









