आळते /वार्ताहर
गावामध्ये स्मार्ट आळते गावची संकल्पना राबवायला सुरू करा. अतिशय सुंदर मॉडेल गाव होईल. गावच्या सोयी-सुविधांसह तरुणांच्या हाताला काम मिळेल. भविष्यकाळात तरुणांसाठी क्लस्टर उभा राहील, असे मत खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केले. आळते (ता. हातकणंगले) येथील गावातील विविध कामांच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते . यावेळी ७५ लाखांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. त्यामध्ये दहा लाख रुपयेचे रस्ते माने यांच्या फंडातून होणार आहेत .
माजी आ. सुरेश हाळवणकर यांनी गावात येणाऱ्या मुख्य रस्त्यासाठी डीपीडीसी मधून मी व खासदार धैर्यशील माने असे आम्ही दोघे मिळून लागेल तेवढा निधी देण्याचे आश्वासन दिले. माजी. जि . प . सदस्य अरुणराव इंगवले यांनी सांगितले. मी सध्या जिल्हा परिषद सदस्य नाही कुठेही पदावर नाही. तरी सुद्धा नेत्यांच्या व अधिकाऱ्यांच्याकडे पाठपुरावा करून ६५ लाखांचा निधी विकास कामासाठी आणला आहे.
कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक लोकनियुक्त सरपंच अजिंक्य इंगवले यांनी केले. तर आभार ग्रा.पं. सदस्य संतोष कांबळे यांनी मानले .
कार्यक्रमास वडगाव मार्केट कमिटीचे संचालक किरण इंगवले , उपसरपंच अमित पाटील , माजी उपसरपंच सुदाम चव्हाण , फैयाज मुजावर , विजय हुकीरे , बळीराजा दुध डेअरीचे चेअरमन सुनील पाटील , ग्रामविकास अधिकारी चंदन चव्हाण यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य , सदस्यां , गावातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









