न्हावेली / वार्ताहर
पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून सुरक्षेसाठी लावण्यात आलेली सीसीटीव्ही यत्रंणा बंद स्थितीत आहे.ती यत्रंणा तात्काळ कार्यान्वित करा,अन्यथा उपोषण करु,असा इशारा न्हावेली सरपंच अष्टविनायक धाऊसकर यांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे.
काल येथील आरपीडी रोडवरुन जात असताना दुपारी १२.३० च्या सुमारास एका बहानाने धडक देत तेथून पलायन केले.याची माहिती आपण पोलीस स्टेशन सावंतवाडी येथे दिली असता याची शहानिशा करत असताना या रोडवरील सावंतवाडी पोलिस स्टेशन मार्फत लावण्यात आलेली सीसीटीव्ही यत्रंणा बंद स्थितीत आढळली.त्यामुळे अज्ञात वाहनाची माहिती मिळू शकली नाही.त्यामुळे याचा आर्थिक फटका आपल्याला सोसावा लागला आहे तरी यापुढे सावंतवाडीतील नागरिकांना जीवितास हानी तसेच अशा इतर समस्यांना सामोरे जावे लागेल याची पोलिस प्रशासन यांनी योग्य ती काळजी घेऊन कार्यवाही न केल्यास उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल,असा इशारा धाऊसकर यांनी दिला आहे.
अनुजा कुडतरकर
Anuja Kudtarkar | journalist # NEWS EDITOR # scriptwriter and content producer at tarun bharat news sindhudurg