ऑगस्टमध्ये पावसाने फिरवली पाठ : महाराष्ट्रात साखर उत्पादनात घट होण्याची चिन्हे
नवी दिल्ली
ऑगस्ट महिन्यात अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांपासून ते साखर उत्पादकांपर्यंत सर्वांचीच चिंता वाढली आहे. उद्योग आणि सरकारी अधिकाऱ्यांनी रॉयटर्सला सांगितले की, भारतातील सर्वोच्च ऊस-उत्पादक राज्य असलेल्या महाराष्ट्रातील साखर उत्पादन 2023-24 पीक वर्षात 14 टक्क्यांवरुन घसरून चार वर्षांतील सर्वात कमी ऑगस्टमध्ये नोंदले जाण्याची शक्यता आहे.
जागतिक बाजारात साखरेचे भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, पुरेशा साखरेचा साठा असल्याने देशांतर्गत बाजारातील किमतीवर फारसा परिणाम होणार नाही. जागतिक किमतीत वाढ झाल्याचा फायदा साखर कारखान्यांना होण्याची शक्यता आहे.
साखरेच्या कमी उत्पादनामुळे अन्नधान्य महागाई आणि साखर निर्यातीवर सरकारी निर्बंध येऊ शकतात. यामुळे जागतिक किमती आणखी वाढतील, ज्या एका दशकाहून अधिक काळातील सर्वोच्च पातळीवर असतील, असं म्हटलं जातंय. तथापि, देशांतर्गत वाढीव किमतींमुळे बलरामपूर शुगर, द्वारिकेश शुगर, श्री रेणुका शुगर्स आणि दालमिया भारत शुगर सारख्या उत्पादकांच्या मार्जिनमध्ये वाढ होईल, ज्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर पैसे देण्यास मदत होईल.
महाराष्ट्रात साखरेचे उत्पादन घटेल
वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या अध्यक्षा बीबी ठोंबरे यांनी सांगितले की, 2023-24 चा सुगीचा हंगाम 1 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. भारताच्या साखर उत्पादनात एक तृतीयांश पेक्षा जास्त योगदान देणाऱ्या महाराष्ट्रात या हंगामात 9 दशलक्ष मेट्रिक टन उत्पादन अपेक्षित आहे, जे मागच्या तुलनेत कमी आहे.
ऑगस्टमध्ये पाऊस कमी
ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा 59 टक्के कमी पाऊस झाल्याने समस्या आणखी वाढली आहे. ते म्हणाले की, यंदा उसाच्या पिकासाठी आवश्यक असणाऱ्या वाढीच्या टप्प्यात पुरेसा पाऊस पडला नाही. जवळपास सर्वच जिह्यात पिकांची वाढ थांबली आहे. कारण, ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा 59 टक्के कमी पाऊस पडला. त्यामुळे साखर उत्पादनावर परिणाम होऊन उत्पादनात घट नोंदवली जाऊ शकते.
उसाच्या पिकाला चांगल्या पावसाची गरज
महाराष्ट्राचे साखर आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सांगितले की, दीर्घकाळचा दुष्काळ आणि उच्च तापमानामुळे यावर्षी उसाचे उत्पादन कमी होईल. दुष्काळामुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी पिकांना सप्टेंबरमध्ये चांगल्या पावसाची नितांत गरज आहे. शतकाहून अधिक काळातील सर्वात कोरड्या ऑगस्टनंतर, सरकारी हवामान खात्याने सप्टेंबरमध्ये सरासरी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
उत्पादन घटल्याने निर्यात कमी
2021-22 च्या हंगामात महाराष्ट्रात विक्रमी 13.7 दशलक्ष टन साखरेचे उत्पादन झाले. यामुळे केंद्र सरकारने विक्रमी 11.2 दशलक्ष टन निर्यातीला परवानगी दिली. 2022-23 हंगामात महाराष्ट्राचे उत्पादन 10.5 दशलक्ष टनांवर घसरल्याने केंद्राने निर्यात 6.1 दशलक्ष टनांवर आणली. त्याचवेळी, गेल्या महिन्यात रॉयटर्सने सांगितले होते की केंद्र सरकार ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या हंगामात साखर कारखान्यांच्या निर्यातीवर बंदी घालू शकते, ज्यामुळे सात वर्षांत प्रथमच शिपमेंट थांबेल.









