वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी खुर्द ग्रा.पं.च्यावतीने मार्कंडेय नदीमध्ये व अलतगा फाटा बंधाऱयावर श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी विद्युत दिवे लावून चांगली सोय केली होती.
ग्रा. पं. अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, उपाध्यक्षा ज्योती पाटील, सदस्य प्रशांत पाटील, वैजनाथ बेन्नाळकरसह इतर सदस्यांनी चांगली सोय केल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात आले. कंग्राळी खुर्द गावाजवळील मार्कंडेय नदीमध्ये कंग्राळी खुर्द, अलतगा, जाफरवाडी, मार्कंडेयनगर, शाहूनगर परिसरातील घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जित करून बाप्पांना निरोप देण्यात आला.









