वार्ताहर/नंदगड
नंदगड येथील लक्ष्मीदेवी यात्रेच्या दहाव्या दिवशीही मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. शुक्रवारी नंदगड गावातील अनेक नागरिकांनी ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पाडला. ओटी भरण्याच्या धार्मिक कार्यक्रमामुळे सर्वत्र मंगलमय वातावरण दिसून येत होते. लक्ष्मीदेवी यात्रा कमिटीने दिलेल्या वेळेनुसार मंगळवार दि. 18 रोजी देवरकर बन, त्यानंतर जुने पाटील, सात गावडा बन, अप्पनगौडा बन आदी बनकर मंडळींनी व बाजारपेठमधील लोकांनी ओटी भरल्या. त्यानंतर कसबा नंदगड ग्रामस्थांच्या व नेरसा ग्रामस्थांकडून ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडला. शुक्रवार दि. 21 रोजी नंदगड गावातील विविध गल्ल्यातील महिलांनी वाद्याच्या गजरात देवीची ओटी भरली. त्यात विविध गल्ल्dयातील महिलांचा सहभाग होता.









