सांगली महापालिका क्षेत्रातील मंगलमूर्ती कॉलनीमध्ये अनधिकृत बांधकाम होत असल्याबद्दची तक्रार स्थानिक रहिवाशांनी केली आहे असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या पाडवा मेळाव्या दरम्य़ान केली होती. त्यावर सांगली मनसे जिल्हा अध्यक्ष तानाजी सावंत यांनी प्रशासनाला बांधकाम ताबडतोब काढून टाका अन्यथा मनसे स्टाईलने ते काढून टाकण्यात येईल असे आव्हान केले.
सांगली महापालिका क्षेत्रातील मंगलमूर्ती कॉलनी मध्ये अनधिकृत रित्या मशिदीचे बांधकाम सुरू होते. त्या बद्दलची तक्रार स्थानिक रहिवाश्यांनी वेळोवेळी पोलीस व महापालिका प्रशासनाकडे देऊनही काही उपयोग होत नव्हता. मशिदीचे बांधकाम ज्याठिकाणी सुरू आहे तेथील शेडमधून रोजच्या रोज अजान होते. दिवसातून 5 वेळा येथे नमाज साठी लोक येतात. त्यांना जर विरोध केला तर ते लोक या स्थानिक लोकांना वेळोवेळी बेदम मारहाण करत होते. म्हणून त्यांनी याची तक्रार मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडे केली.
त्यांनी कालच्या गुढीपाडवा सभेत याची दखल घेतल्यानंतर पोलीस आज याठिकाणी पोहोचले आहेत. व त्यांनी हा कडेकोट बंदोबस्त लावला आहे. स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. बरेच लोक येथुन घेतलेले प्लॉट विकून दुसरीकडे निघून जात असल्याचे या लोकांनी सांगितले. तर काल राज ठाकरे यांनी या प्रकाराची दखल घेतल्याने आज मनसैनिक ही मोठ्या संख्येने जमले होते. या जागेवर शाळेचे आरक्षण ही आहे तरीही महापालिका प्रशासनाने आपल्या जागेवर होत असलेल्या अतिक्रमणाची नोंद अद्याप घेतली नव्हती. काल झालेल्या राज ठाकरे यांच्या सभेने आज सांगली पोलीस आणि मनपा प्रशासन दोघांनाही जाग आली आहे. जर महापालिका प्रशासनाने हे अतिक्रमण काढले नाही तर आपण मनसे स्टाईलने कारवाई करणार असल्याचे मनसे जिल्हाप्रमुख तानाजी सावंत यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.