सावंतवाडी / प्रतिनिधी
Immediately put up signs indicating speed breakers at the degway; The demand of the villagers..!
सावंतवाडी तालुक्यातील बांदा-दोडामार्ग रस्त्यावर असलेल्या डेगवे गावातील श्री स्था्पेश्वर मंदिराकडे असलेल्या .ठिकाणी स्पिड बेकर आहेत.परंतु सदर ठिकाणी स्पिड बेकर असलेल्या ठिकाणी दर्शविणारे फलक व पांढरे पट्टे नसल्याने वाहन चालक भरघाव वेगाने वाहन चालवताना दिसून येतात.त्यामुळे तेथे स्पिड ब्रेकर पाहून अचानक गाडीचा ब्रेक लावल्याने मोठ्या प्रमाणात तेथे सातत्याने अपघात होत असल्याचे दिसत आहे.अलीकडच्या काळात म्हणजे २-४ दिवसात मोटारसायकलचा व एसटी व डंपरचा अपघात मोठ्या प्रमाणात झाला आहे.त्यामुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे डेगवेग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेना उपविभाग प्रमुख श्री विजय देसाई व ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौ.वैदेही देसाई यांनी प्रथमदर्शनी पाहिले आहे.
सदर रस्यावरून मोठ्या प्रमाणात जड वाहने व डंपर याची वाहतूक सातत्याने होत असते.या रस्त्यावर प्राथमिक व माध्यमिक शाळा असल्याने लहान मुलांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.त्यामुळे तेथे तात्काळ स्पिड ब्रेकर फलक व पांढरे पट्टे लावा अशी मागणी कार्यकारी अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी विभागाकडे केली आहे.अन्यतः डेगवे ग्रामस्थाना आंदोलन करावे लागेल.असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने दिला आहे.









