सावंतवाडी / प्रतिनिधी
शिवसेना उपविभाग प्रमुख विजय देसाई यांची मागणी..!
सावंतवाडी तालुक्यातील बांदा-दोडामार्ग रस्त्यावर असलेल्या डेगवे गावातील श्री स्था्पेश्वर मंदिराकडे व सदर रस्त्यावरील अन्य ठिकाणी असलेलें ४ स्पिड बेकर आहेत.परंतु सदर ठिकाणी स्पिड बेकर असलेल्या ठिकाणी दर्शविणारे फलक व पांढरे पट्टे नसल्याने वाहन चालक अति भरघाव वेगाने वाहन चालवताना दिसून येतात.त्यामुळे तेथे स्पिडब्रेकर्स पाहून अचानक गाडीचा ब्रेक लावल्याने मोठ्या प्रमाणात तेथे सातत्याने अपघात होत आहेत.त्यामुळे तेथे तात्काळ स्पिड बेक्रस्रचे पट्टे लावण्या बाबतीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व काँट्रॅकटर श्री महेश पाटील यांच्याशी सातत्याने संपर्क साधला आहे.असे असतानाही तेथे जाणीवपूर्ण दूर्लक्ष होत आहे.असे खेदाने नमूद करावे लागते आहे.
अलीकडच्या काळात मोटारसायकलचा व एसटी व डंपरचा अपघात मोठ्या प्रमाणात झाला आहे.त्यामुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे डेगवेग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेना उपविभाग प्रमुख श्री विजय देसाई यांनी प्रथमदर्शनी पाहिले आहे.त्यामुळे मोठी जिवीतहानी होण्यापूर्वी तातडीने तेथे लक्ष देण्याची तेथेअंत्यत गरज आहे.
सदर रस्यावरून मोठ्या प्रमाणात जड वाहने व डंपर याची वाहतूक सातत्याने होत असते.या रस्त्यावर प्राथमिक व माध्यमिक शाळा असल्याने लहान मुलांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.त्यामुळे तेथे तात्काळ स्पिड ब्रेकर फलक व पांढरे पट्टे लावा अशी मागणी कार्यकारी अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी विभागाकडे केली आहे.अन्यतः डेगवे ग्रामस्थाना तेथे मोठ्या प्रमाणातआंदोलन छेडावे लागेल.असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने डेगवे ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेना उपविभाग प्रमुख विजय देसाई यांनी दिला आहे.









