कोल्हापूर :
संपूर्ण जिह्यात सुऊ झालेले सर्वच प्रकारचे अवैध धंदे तात्काळ बंद करावे. अवैध धंदेवाल्याच्याकडून हप्ता आणण्याऱ्या पोलीस कलेक्टरची खातेनिहाय चौकशी कऊन, त्याच्या मालमत्तेची चौकशी करावी. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रभारी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्याकडून दाखल गुह्याची उकल करणे, जिह्यात गुंडाच्यावर वचक निर्माण करीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सोडून वेगवेगळ्या वसुलीत गुंतले आहेत, याची चौकशी करावी. अन्यथा 26 जानेवारी रोजी सकाळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी आणि पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर शिवसेनेकडून (उबाठा गट) आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांना शिवसेना (उबाठा गट) उपनेते संजय पवार, विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली शिष्ठमंडळाने शुक्रवारी दुपारी निवेदनाव्दारे दिले. हे निवेदन अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी स्विकारले. यावेळी विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक प्रविण खानापूरे उपस्थित होते.
गेल्या काही महिन्यामध्ये जिह्यात सर्वच प्रकारचे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुऊ आहेत. या अवैध धंद्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या प्रभारी पोलीस अधिकाऱ्याबरोबर ज्या त्या पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांनी अर्थपूर्ण चर्चा कऊन, परवान्या देवून पाठबळ देत, अवैध धंदेवाल्याच्याकडून पोलीस अधिकारी महिन्याला मोठी आर्थिक माया गोळा करीत आहेत. या आर्थिक लोभा पायी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या प्रभारी पोलीस अधिकाऱ्यासह पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांनी अवैध धंद्याकडे साफ दुर्लक्ष केले. त्यामुळे संपूर्ण जिह्यात मटका, अनाधिकृत लॉटरी व्यवसाय, कॅसिनो, लॉजवरती कुंटणखाने मनोरंजन मंडळाच्या गोडस नावाखाली तीन पानी, अंदर–बाहर सारखे जुगार क्लब खुलेआम सुऊ झाले आहे. तसेच गुटखा, गांजा, मावा आणि एमडी ड्रग्ज या सारखा अंमली पदार्थाची शहरासह ग्रामीण भागात उघड विक्री केली जात आहे. या अंमली पदार्थाच्या विक्रीमुळे तऊण–तऊणी नशिल्या पदार्थाच्या विळख्यात आडकत जावू लागले आहेत. तर अनेक कुटूंबे देशोधडीला लागली आहेत. त्यामुळे जिह्यातील जनतेचा पोलीस प्रशासनावरील विश्वास दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. यांची गांभीर्याने दखल घेवून, संपूर्ण जिह्यातील सर्वच प्रकारचे बेकायदेशिर धंदे त्वरीत बंद करावेत, अन्यथा 26 जानेवारी रोजी सकाळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी आणि पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांच्या कार्यालयासमोर शिवसेनेकडून (उबाठा गट) धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
एलसीबी गुंतली वसुलीत ?
एलसीबी तथा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणून रविंद्र कळमकर काम पाहत आहेत. त्यांची आणि त्याच्या सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांची अवैध धंदे करणाऱ्याविरोधी धडक कारवाई करीत, पोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या दाखल गुह्याचा उलगडा कऊन, जिह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असते. पण जिह्यात अवैध धंदे धुमधडाक्यात सुऊ झाल्याने, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस कर्मचारी वेगवेगळ्या वसुलीत गुंतले आहेत का ? अशा प्रश्न निर्माण झाल्याचे शिवसेनेचे (उबाठा गट) उपनेते संजय पवार आणि विजय देवणे यांनी म्हटले आहे.
‘त्या’ पोलिसांच्या नावाचा निवेदनात उल्लेख
शिवसेने (उबाठा गट) कडून पोलीस अधिक्षकांना शुक्रवारी दिलेल्या निवेदनात मटका, क्लब, ऑनलाईन लॉटरी, कॅसिनो, रेशन धान्य दुकान चालक, अवैध दाऊ विक्री, गुटखा वाहतुक व विक्री, मटक्याचे बेटिंग, लॉजिंग, घरगुती गॅसचा काळा बाजार करणारे अशा व्यक्तीच्याकडून महिन्याला हप्ता वसुल करणाऱ्या पोलीस कलेक्टरच्या नावाचाही उल्लेख करण्यात आला आहे. या पोलीस कलेक्टर कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करावी, अशी ही मागणी करण्यात आली.








