वेंगुर्ले (वार्ताहर)-
वेंगुर्ले शहरातील महत्वपूर्ण पर्यटन स्थळ बनलेल्या झुलत्या पुलाच्या ठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरु झाली आहे. त्यामुळे पुला लगतच्या रस्त्यावर ट्रँफिक ची समस्या निर्माण होत आहे. पर्यटन वाढले पाहिजे, पण पर्यटक दुखावले जाऊ नयेत. यासाठी नगर परिषदे मार्फत पोलीस स्टेशनला कळवून त्या जागी ट्रँफिक पोलीस विशिष्ट वेळेत यि ठिकाणी राहून डुटी बजावल्यास हि समस्या सुटू शकते. याबाबत कार्यवाही करावी. अशी मागणी वेंगुर्ले शहर शिवसेना पक्षातर्फे शहर प्रमुख उमेश येरम यांनी न.प.चे मुख्याधिकारी परितोष कंकाळ व वेंगुर्ले पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांचेकडे केली होती. त्यानुसार आज गुरुवारी पोलिसांतर्फे दाभोसवाडा येथे बँरीकेट लावून चारचाकी वाहनांना त्या भागात पार्किंग करुन पुढील प्रवास पायी प्रवास पर्यटकांना करावा लागणार आहे.आज ट्रँफिक पोलीस गौरव परब यास अन्य पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी दाभोसवाडा येथे बँरीकेट लावून सर्व चारचाकी वाहनांना दाभोसवाडा ते मांडवी रोड परीसरात पार्किंग साठी जागा उपलब्ध करून दिली.
दरम्यान, थेट वेंगुर्ले बंदर येथे पर्यटन व मासे खरेदी करण्यासाठी जाणाऱ्या पर्यटक व स्थानिक लोकांना मात्र नाहक सुमारे 700 मीटर चालत जाण्याचा व तेवढच अंतर येण्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. हि बाब लक्षात घेऊन ट्रफिकचे नियोजन करण्याची गरज आहे.








