वैद्यकीय सेवेवर परिणाम होणार : कोलकात्यातील घटनेचे पडसाद
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
शनिवार, 17 ऑगस्ट रोजी सर्व लहान-मोठ्या ऊग्णालयांमध्ये संप जाहीर करण्यात आला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशननेही 17 ऑगस्टला देशव्यापी संपाची घोषणा केल्यामुळे देशभरातील केवळ सरकारी निवासी डॉक्टरच नाही तर खासगी डॉक्टर, प्राथमिक आरोग्य केंद्र, सामुदायिक आरोग्य सेवा केंद्र आणि जिल्हा ऊग्णालयांमध्ये कार्यरत असलेल्या प्रत्येक लहान-मोठ्या ऊग्णालयातील डॉक्टरही संपावर जाण्याची शक्मयता आहे. एवढेच नाही तर 16 ऑगस्टपासून डॉक्टरांसह नर्सिंग युनियननेही संप सुरू केला आहे. नर्सिंग युनियन शनिवारीही संपावर जाणार आहेत.
कोलकात्यात प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येनंतर कोलकाताच नव्हे तर संपूर्ण देशातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. राजधानीत न्यायाच्या मागणीसाठी अनेक डॉक्टर रस्त्यावर उतरले आहेत. ऊग्णालयांना कुलूप लागल्याने असहाय्य ऊग्ण उपचारासाठी भटकत आहेत. एम्स, सफदरजंग, आरएमएल, दिल्ली स्टेट पॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये पोहोचणाऱ्या अत्यंत गंभीर कर्करोग, हृदय आणि किडनीच्या ऊग्णांनाही उपचार मिळत नाहीत. वैद्यकीय सेवा कोलमडली असतानाच आता ‘आयएमए’ने देशव्यापी बंदची हाक दिल्याने आज 17 ऑगस्टपासून संपाची तीव्रता वाढणार आहे.
संपाच्या काळात ऑपरेशन थिएटर, रेडिओलॉजिकल चाचण्या, वैकल्पिक सेवा, ऊग्ण प्रवेश पूर्णपणे बंद करण्याची घोषणा केली आहे. काही संघटनांनी आपत्कालीन सेवा बंद ठेवण्याची सूचना केली आहे. अशा स्थितीत आपत्कालीन सेवाही बंद ठेवल्यास अतिगंभीर परिस्थितीत येणाऱ्या ऊग्णांना त्याचा फटका बसू शकतो. संपाच्या माध्यमातून आयएमएने ऊग्णालये सेफ झोन म्हणून घोषित करण्याची मागणी केल्यामुळे देशातील वैद्यकीय सेवेवर याचा मोठा परिणाम दिसून येणार आहे. तसेच आजपासून देशभरातील डॉक्टरांकडून आंदोलन तीव्र करण्याचे संकेत देण्यात आले आहे. आयएमएने एक पत्रक काढून 17 ऑगस्ट रोजी बंद पुकारण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. संपामुळे सर्व दवाखाने, क्लिनिक्स, ओपीडीच्या सेवा 17 ऑगस्ट सकाळी 6 ते 18 ऑगस्ट सकाळी 6 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. तब्बल 24 तास सेवा बंद राहणार आहे. या दरम्यान अत्यावश्य सेवा सुरू राहणार असल्याचे सांगितले जात आहे.
खासगी रुग्णालयांमध्ये केवळ आपत्कालीन सेवा
शनिवारी सकाळी 6 ते रविवारी सकाळी 6 या 24 तासांत खासगी रुग्णालयांमध्ये केवळ आपत्कालीन सेवाच सुरू राहणार असल्याची माहिती आयएमएने दिली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन एकजुटीने या संपामध्ये उतरणार आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा कायदा करण्याच्या मागणीसाठी देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कायदा आणला पाहिजे. जवळपास 25 राज्यांमध्ये डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कायदे असले, तरी ते त्याची अंमबजावणी होताना दिसत नाही, असे दावे केले जात आहेत.









