बेंगळुरात आंध्रप्रदेशातील चौघांना अटक
बेंगळूर : कांद्याच्या पोत्यांसोबत चंदनाची बेकायदा वाहतूक करणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून 1 कोटी 12 लाख रुपये किमतीचे 750 किलो चंदन जप्त करण्यात आले आहे. बेंगळूरच्या सिद्धापूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. भूपाल (वय 40), शेख अब्दुल कलाम (वय 43), शेख शाहरुख (वय 31), परमेश (वय 30) अशी या प्रकरणी अटक केलेल्यांची नावे आहेत. ते सर्वजण आंध्रप्रदेशमधील रहिवासी आहेत. 15 ऑक्टोबर रोजी सिद्धापूर पोलील स्थानकाचे उपनिरीक्षक कृष्णप्पा पुजार यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सिद्धापूर येथील एका हॉटेलजवळ दिल्ली नोंदणीही महिंद्रा एक्सयुव्ही कार व चंदनाची लाकडे वाहतूक करणारी महिंद्रा बोलेरो अडवून आरोपींना अटक करण्यात आली.









