खानापूर प्रतिनिधी : खानापूर तालुक्यातील डुक्करवाडी येथील अप्पू गुरुसिध्द पाटील यांच्या शेताच्या वरील बाजूस अवैधरीत्या वाळू काढल्यामुळे अप्पू पाटील यांचे वीस पोती भात पिकाचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. याबाबत अप्पू पाटील यांनी वेळोवेळी तहसीलदार कार्यालय पोलीस ठाणे तसेच कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती मात्र याची दखल घेण्यात आलेली नाही.
क्षेत्रातील सर्वे नंबर ३५/१२/३ या शेताच्या वरील बाजूस शेतीचे मालक मंजुनाथ देसाई, ज्योतिबा गुरव,संभाजी गुरव ,हे अवैधरित्या वाळू काढत आहेत. वाळू काढताना निर्माण होणारी माती ते माझ्या शेतात सोडत आहेत. त्यामुळे माझ्या शेतीचे फार मोठे नुकसान होत आहे .तसेच या ठिकाणी असलेला नालाही यांनी वळवला आहे .तसेच या ठिकाणी शेतीला जाण्यासाठी असलेला आनंद रस्ता ही फोडून बंद करण्यात आलेला आहे. यामुळे माझ्या शेतीचे नुकसान झाल्याची तक्रार तहसीलदार कार्यालय, पोलीस स्टेशन, तसेच कृषी अधिकाऱ्याने, दिले मात्र याबाबत गेल्या तीन महिन्यापासून तक्रार करून देखील दखल घेण्यात आली नाही उलट मलाच दमदाटी करून कार्यालयातून परत पाठवत आहेत असे अप्पू पाटील यांनी सांगितले.









