प्रतिनिधी /बेळगाव
रेशनच्या तांदळाचा साठा करून त्याची बेकायदा विक्री करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या दोघा जणांना मारिहाळ पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी ही कारवाई करण्यात आली असून त्यांच्याजवळून सुमारे 16 हजार रुपये किमतीचा सात क्विंटल तांदूळ व महिंद्रा गुड्स वाहन जप्त करण्यात आले आहे.
बसवंत पिराजी पाटील (वय 51), सूरज पांडुरंग पाटील (वय 28) दोघेही राहणार खणगाव के. एच. अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 चे कलम 3, सहकलम 7 अन्वये मारिहाळ पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
मारिहाळचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक, उपनिरीक्षक चंद्रशेखर सी., एच. आय. कुंभार, बी. एन. बळगन्नावर, एम. बी. बडीगेर, आय. एम. शिलवंतर, एस. एम. गौडर आदींनी खणगावहून अंकलगीकडे जाणाऱ्या रोडवर ही कारवाई केली असून केए 16 बी 0695 क्रमांकाच्या गुड्स वाहनातून विक्रीसाठी रेशनचा तांदूळ नेताना त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.









