लोणावळा / वार्ताहर :
एकविरा देवी उत्सवादरम्यान अवैध दारुविक्री करणाऱ्यांवर धडाकेबाज कारवाई करत 36,720 रुपयांच्या विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी 3 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
लोणावळा उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांना एकविरा देवी चैत्री उत्सवादरम्यान अवैध दारुविक्री करणाऱ्यांची माहिती मिळाली. या परिसरात पेट्रोलिंग करत असताना भूषण विनायक पडवळ, केशव नारायण चौधरी, नवनीत कोरागा खंबाडी (सर्व रा. वेहेरगाव ता. मावळ जि. पुणे) यांच्याकडे विदेशी दारुचा साठा आढळून आला. पोलिसांनी 36,720 रुपयांच्या विदेशी दारुसाठय़ासह तिघांना ताब्यात घेतले आहे. सहायक पोलीस उपनिरीक्षक मारुती बारकू गोफण यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अधिक वाचा : टेल्कोचे कामगार ते खासदार… असा होता गिरीश बापट यांचा जीवनप्रवास