9 गॅस सिलेंडर, 2 मोटर आणि 2 डिजीटल वजन काटे असा 48 हजार 260 रुपयांचा मुद्देमाल जप्त
इचलकरंजी / प्रतिनिधी
शहरातील नमाजगे मळ्यामध्ये बेकायदेशिरपणे सुरु असलेल्या गॅस पंपावर पोलिसांनी छापा टाकला. एकास अटक करीत, त्यांच्याकडून 9 गॅस सिलेंडर, 2 मोटर आणि 2 डिजीटल वजन काटे असा 48 हजार 260 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. प्रशांत गायकवाड असे त्याचे नाव आहे. ही कारवाई शिवाजीनगर पोलिसांनी केली.
संशयीत आरोपी प्रशांत गायकवाड याने शहरातील नमाजगे मळ्यामध्ये काही दिवसापूर्वी अवैधपणे गॅस पंप सुरु केला होता. यांची माहिती पोलिसांना बातमीदाराकडून समजली. त्यावरून पोलिसांनी बेकायदेशिरपणे सुरु असलेल्या गॅस पंपावर छापा टाकला. संशयीत गायकवाडला अटक करीत, त्याच्याकडून 9 गॅस सिलेंडर, 2 मोटर आणि 2 डिजीटल वजन काटे असा 48 हजार 260 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.









