वृत्तसंस्था/ इंफाळ
आसाम रायफल्सने मणिपूरमधील चुराचंद्रपूर जिह्यातील खुगा गावात 350 पोती बेकायदेशीर सुपारी जप्त केली आहे. या सुपारीची किंमत 2.4 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. सुपारीच्या तस्करीत सहभागी असलेल्या आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. संशयित आरोपींची अधिक चौकशी तपास यंत्रणांकडून केली जात आहे.
मिझोरामच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू ट्रकची तपासणी केली जात असताना ही कारवाई करण्यात आल्याचे आसाम रायफल्सने सोमवारी सांगितले. सुपारीची पोती भरलेले तीन ट्रक जप्त करण्यात आले असून सदर मालाची तस्करी केली जात असल्याची बाब उघड झाली आहे.









