IL&FS scam case : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आज ईडीकडून चौकशी होत आहे. आय़एल आणि एफएल प्रकरणी ही चौकशी आहे. आज सकाळपासूनच राज्यभर कार्यकर्ते संतप्त झाले असून आंदोलनाचा इशारा दिला आहे. मात्र ते जे काही माहिती मागतील त्याला मी सहकार्य करेन आणि पुरवेन, असे जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
गेल्या आठवड्यात, ईडीने IL&FS प्रकरणात जयंत पाटील यांना ईडीसमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावले. 11 मे रोजी ईडीने पाटील यांना या प्रकरणात त्यांचे म्हणणे नोंदवण्यासाठी ईडीसमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावले. पाटील यांनी त्यांच्या व्यस्त वेळापत्रकाचा हवाला देत फेडरल एजन्सीसमोर हजर राहण्यासाठी ईडीला आणखी एक तारखेची विनंती करत 10 दिवसांची मुदत मागितली होती.दरम्यान, आज जयंत पाटील मुंबईत सकाळी हजर झाले.
तीन अधिकारी जयंत पाटलांची चौकशी करत आहेत.तर एक तपास अधिकारी त्यांना प्रश्न विचारत आहेत.तर अन्य दोन तपास अधिकारी जबाब नोंदवून घेत आहेत. ईडी झोनचे सहसंचालक निखील कुमार गोविल यांच्या नेतृत्वात तपास सुरु आहे.
जयंत पाटील यांची ट्विट करत कार्यकत्यांना विनंती
आज सकाळी ११ वाजता मी ईडी कार्यालयात उपस्थित राहणार आहे. ईडीचे समन्स आल्यापासून मला राज्यभरातून माझ्या पक्षातील व इतर मित्र पक्षांतील पदाधिकाऱ्यांचे फोन येत असून राज्यभरातून लोक आज ईडी कार्यालयाबाहेर येत असल्याचे मला समजत आहे.माझी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विनंती आहे कि कोणीही मुंबईला येऊ नये. मी या चौकशीकामी ईडीला पूर्णपणे सहकार्य करणार असून आपण सर्वांनी माझ्याप्रती दाखवलेल्या प्रेमाबद्दल मी आपला आभारी आहे अस ट्विट जयंत पाटील यांनी केले.
काय आहे IL & FS घोटाळा?
-IL&FSनं कोहिनूर CTNL कंपनीला 760 कोटींचं कर्ज दिलं.
-पुरेसं तारण न घएताच कर्ज दिल्याचा आरोप
-नंतर कोहिनूर CTNL हे कर्ज फेडू शकली नाही.
-कर्ज देताना IL&FS नं अनेक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.
-अशाप्रकारे अनेक कंपन्यांना बोगस लोन दिल्याचा आरोप आहे.
-सप्टेंबर 2018 मध्ये IL&FS कडून कर्जाचे हफ्ते थकण्यास सुरुवात झाली.
-IL&FS चे हफ्ते थकल्यावर घोटाळा उघड
-घोटाळ्याचा तपास थांबावा यासाठी IL&FS कडून प्रयत्न सुरु झाला.
-11-12 नेत्यांशी निगडित कंपन्यांना L&FS नं पैसे दिल्याचा आरोप आहे.
-नेत्यांच्या या यादीत जयंत पाटील यांचाही समावेश आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








