वृत्तसंस्था /सिडनी
ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू महिला क्रिकेटपटू इलेसी पेरीबरोबरचा सिडनी सिर्क्सचा करार आणखी दोन वर्षांसाठी वाढवण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियात होत असलेल्या महिलांच्या बिग बॅश लिग क्रिकेट स्पर्धेसाठी सिडनी सिक्सर्स संघाने इलेसी पेरीबरोबरचा करार वाढवण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. इलेसी पेरी सिडनी सिक्सर संघाची कर्णधार असून तिने यापूर्वी बराच कालावधी सिडनी सिक्सर्स बरोबर घालविला आहे. येत्या उन्हाळी मोसमात बिग बॅश लिग महिलांच्या क्रिकेट स्पर्धेत सिडनी सिक्सर्सचे नेतृत्व पुन्हा इलेसी पेरीकडे सोपवण्यात आले आहे. बिग बॅश लिग स्पर्धेला 19 ऑक्टोबरपासून प्रारंभ होत असून सिडनी सिक्सर्सचा पहिला सामना मेलबोर्न स्टार्सबरोबर होणार आहे. 2015 पासून 32 वर्षीय इलेसी पेरी सिडनी सिक्सर्सचे प्रतिनिधीत्व करत आहे. बिग बॅश लिग स्पर्धेत इलेसी पेरीने नवा विक्रम केला आहे. त्यामुळे तिला या स्पर्धेत मालिकावीर म्हणून घोषित केले होते. तिने या स्पर्धेत 2000 धावांचा टप्पाही ओलांडला आहे. 2016, 2018 आणि 2020 साली इलेसी पेरीने बेलिंडा क्लार्क पुरस्कार मिळवला आहे. इलेसी पेरीने 142 टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधीत्व करताना 87 डावात 1627 धावा जमवल्या असून त्यामध्ये 8 अर्धशतकांचा समावेश आहे.









