चेन्नई :
प्रख्यात संगीतकार इलैयाराजा यांची कन्या भवतारिणी हिचे नुकतेच कर्करोगाने निधन झाले. उपचार सुरू असतानाच तिने श्रीलंकेत अखेरचा श्वास घेतला. भवतारिणी हिने अनेक चित्रपटांसाठी गाणी गायली होती. मात्र, वयाच्या 47 व्या वषी त्यांचे निधन झाले. शुक्रवारी भवतारिणी यांचे पार्थिव श्रीलंकेतून चेन्नईतील इलैयाराजांच्या घरी आणण्यात आले. तसेच शनिवारी सकाळी थेनी जिल्ह्यातील गुडालूर येथील त्यांच्या निवासस्थानी पार्थिव पोहोचले. त्यानंतर शनिवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. भारती चित्रपटातील ‘मायल पोला पोन्नू ओन्नू’ या गाण्यासाठी भवतारिणीला सर्वोत्कृष्ट गायिकेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता.









