IIT Bombay : चंदीगड विद्यापीठातील वसतीगृहातील प्रकरण समोर आल्याची घडना ताजी असतानाच आता मुंबईमध्येही एका विद्यार्थिनीचा अश्लील व्हिडीओ बनवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (IIT Bombay) विद्यार्थिनीने पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी कँटीनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रविवारी रात्री ही घटना घडली आहे. हे प्रकरण समोर येताच आयआयटीने एक निवेदन जारी केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,
रविवारी रात्री कँटीनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने वसतिगृह 10 (H10) च्या बाथरूममध्ये तिचा आक्षेपार्ह व्हिडीओ बनवला. असा आरोप विद्यार्थिनीने केला आहे. पोलिसांनी संशयताला चौकशीसाठी बोलावले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. पिंटू गरिया असं अटक करण्यात आलेल्याचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपीच्या मोबाईलमधून अद्याप कोणताही व्हिडीओ सापडलेला नाही.
मुंबई आयआयटी निवेदनात काय म्हटलं आहेआयआयटीच्या वसतिगृहातील नाईट कॅंटीनमध्ये काम करणारा कर्मचारी पाईप डक्टवर चढून बाथरूममध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग करत होता. सध्या त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. संशियताकडे असलेल्या फोनमध्ये कोणते फुटेज आहे, याबाबत आम्हाला अद्याप काहीही माहिती नाही. कँटीनला तात्काळ बंद करण्यात आले असून केवळ महिला कर्मचारी असताना ही सुरु राहणार आहे.
संशियताने ज्या पाईपचा वापर केला, तो परिसर सध्या ब्लॉक करण्यात आला आहे. आयआयटी मुंबई आपल्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभी आहे. आमच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी जे आवश्यक आहे, ते सर्व आम्ही करू असे निवेदनात म्हटलं आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









