एनआयआरएफ-2023’ क्रमवारी घोषित, सर्वसाधारण श्रेणीतील टॉप-10 संस्था
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सोमवारी ‘एनआयआरएफ’ रँकिंग 2023 जाहीर केली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रासने देशभरातील संस्थांच्या एकूण क्रमवारीत पुन्हा एकदा पहिले स्थान मिळवले आहे. गेल्यावषी म्हणजे 2022 च्या क्रमवारीतही आयआयटी-मद्रासने पहिले स्थान मिळवले होते. आयआयएससी बेंगळूर आणि आयआयटी-दिल्ली यांचा अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक लागतो. यंदा चौथ्या स्थानावर आयआयटी बॉम्बे, पाचव्या स्थानावर आयआयटी कानपूर आहे.
शिक्षण मंत्रालयाने सोमवारी 2023 साठी नॅशनल इंस्टीट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (‘एनआयआरएफ’) जाहीर केले. यंदाच्या नामांकनानुसार एकंदर श्रेणीत ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मद्रास’ यावषी सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्था ठरली आहे. ‘एनआयआरएफ’ची सुऊवात चार श्रेणींनी झाली असून आता आठव्या वर्षी यात 8 विभागनिहाय क्रमवारीसह 12 श्रेणी जाहीर करण्यात आल्या आहेत. एकूण संस्थांच्या टॉप-10 यादीमध्ये सात ‘आयआयटीं’चा समावेश आहे. आयआयएससी बेंगळूर, जेएनयू दिल्ली आणि एक वैद्यकीय महाविद्यालय एम्स दिल्ली या दोन विद्यापीठांनी टॉप-10 मध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. मागील वर्षीच्या एनआयआरएफ 2022 रँकिंगमध्ये ‘आयआयएससी बेंगळूर’ला संशोधन आणि विद्यापीठ श्रेणीत प्रथम क्रमांक मिळाला होता.
नॅशनल इंस्टीट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (‘एनआयआरएफ’) अंतर्गत भारत सरकार देशभरातील उच्च शैक्षणिक संस्थांची क्रमवारी त्यांच्या कामगिरीच्या आधारे ठरवते. त्यानुसार सर्वोत्कृष्ट अध्ययनासाठी सर्वाधिक पसंती दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक संस्थांची क्रमवारी जाहीर केली जाते. त्यानुसार अभियांत्रिकीसाठी कोणते ‘आयआयटी’ सर्वोत्तम आहे, तसेच कोणते वैद्यकीय महाविद्यालय सर्वोत्तम डॉक्टर तयार करते आदींची रँकिंग सुपूर्द केली जाते. सरकारी पातळीवर याची सुऊवात 2016 साली झाली होती. 2016 पूर्वी, देशातील उच्च शैक्षणिक संस्थांची श्रेणी केवळ खासगी संस्था किंवा माध्यमांद्वारे निश्चित केली जात होती.
टॉप-5 विद्यापीठ…
आईएससी, बेंगळूर 1
जेएनयू, दिल्ली 2
जामिया मिलिया इस्लामिया 3
जाधवपूर विद्यापीठ 4
बनारस हिंदू विद्यापीठ 5
टॉप-5 मॅनेजमेंट संस्था
आयआयएम अहमदाबाद 1
आयआयएम बेंगळूर 2
आयआयएम कोझिकोड 3
आयआयएम कोलकाता 4
आयआयटी दिल्ली 5









