बेळगाव : बेळगावचे माजी जिल्हा पोलीस प्रमुख व कर्नाटकचे आयजीपी संदीप पाटील यांनी थायलंड येथे आयोजित जगातील खडतर समजली जाणारी ‘आयर्न मॅन’ शर्यत जिंकली आहे. थायलंड येथे गेल्या रविवारी आयर्न मॅन शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. सदर शर्यतीमध्ये जगभरातील 2000 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. या शर्यतीचे स्वरुप 1.9 कि. मी. जलतरण, 90 कि. मी. सायकलिंग आणि 21 कि. मी. धावणे असे होते. शर्यतीत सहभागी स्पर्धकांसमोर हे तीन क्रीडा प्रकार विक्रमी वेळेत सलग पूर्ण करण्याचे खडतर आव्हान होते. सदर आव्हान यशस्वीरीत्या पेलत आयजीपी संदीप पाटील यांनी थायलंड येथील आयर्न मॅन शर्यतीचे विजेतेपद हस्तगत केले. जागतिक स्तरावरील अतिशय खडतर समजली जाणारी ही स्पर्धा जिंकल्याबद्दल संदीप पाटील यांचे कौतुक होण्याबरोबरच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तंदुऊस्त आरोग्य आणि जिद्दीसह खडतर मेहनत घेण्याची तयारी असल्यास कोणतीही स्पर्धा जिंकणे अशक्मय नसते. हे सिद्ध करताना आयर्न मॅन सारखी अत्यंत खडतर शर्यत जिंकण्याद्वारे संदीप पाटील यांनी तंदुऊस्त आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. संदीप पाटील हे 2004 बॅचचे कर्नाटक केडरचे अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी बेळगाव येथे जिल्हा पोलीस प्रमुखपद समर्थपणे सांभाळले आहे.
Previous Articleप्रत्येक गड-किल्ला महाराजांचे प्रेरणास्थान
Next Article समादेवी जन्मोत्सवाला उत्साहात प्रारंभ
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









