वृत्तसंस्था / न्यूयॉर्क
सोमवारी सनसिनॅटी ओपन जिंकल्यानंतर, इगा स्वायटेक यूएस ओपन मिश्र दुहेरी स्पर्धेत कॅस्पर रुडसोबत खेळताना अमेरिकन मॅडिसन कीज आणि फ्रान्सिस टायफो यांचा 4-1, 4-2 असा पराभव करुन उपांत्य फेरीत प्रवेश केला.
बुधवारी उपांत्य फेरीत त्यांचा सामना जेसिका पेगुला आणि जॅक ड्रॅपर यांच्याशी होईल. त्यांनी मायरा अँड्रीव्हा आणि डॅनिल मेदव्हेदेव यांच्याविरुद्ध 4-1, 4-1 असा उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवला. यापूर्वी स्पर्धेच्या पहिल्या फेरीत, पेगुला आणि ड्रॅपर यांनी एम्मा राडुकानु आणि कार्लोस अल्कारेझ यांचा 4-2, 4-2 असा पराभव केला. मंगळवारी यूएस ओपन मिक्स्ड डबल्स चॅम्पियनशिपच्या पहिल्या फेरीत ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता आणि सर्बियन टेनिसपटू नोवाक जोकोविच आणि ओल्गा डॅनिलोवी यांना पहिल्या फेरीत मिरा अँड्रीवा-डॅनिल मेदव्हेदेव यांच्याविरुद्ध 4-2, 5-3 असा पराभव पत्करावा लागला. उपांत्य फेरीपर्यंत तिसऱ्या सेटऐवजी 10 पॉईंट मॅच टायब्रेकरसह चार गेमचे सेट वापरायचे होते. फक्त अंतिम सामना नियमित सामन्यासारखा असेल. ज्यामध्ये सहा गेमचे सेट 6-ऑलवर टायब्रेकर आणि तिसऱ्या सेटसाठी 10 पॉईंट टायब्रेक असेल.
पहिल्या फेरीत सारा इरानी-आंद्रिया वोवासीरी यांनी टेलर फ्रित्झ-एलेना रायबाकिना यांच्यावर 4-2, 4-2, कॅटी मॅकनाली-लॉरेन्झो मुसेटी यांनी गेल मोनफिल्स-नाओमी ओसाकावर 5-3, 4-2, कॅस्पर रुड- स्वायटेक यांनी मॅडिसन कीज-फ्रान्सिस टियाफो 4-1, 4-2 यांच्यावर, बेन शेल्टन-टेलर टाऊनसेंड यांनी अमांडा अॅनिसिमोव्हा- होल्गर रुने यांच्यावर 4-2, 5-4 (7-2), जॅक ड्रेपर-जेसिका पेगुला यांनी कार्लोस अल्कारेझ-एम्मा राडुकानु यांच्यावर 4-2, 4-2, मिरा अँड्रीवा-डॅनिल मेदव्हेदेव यांनी बेलिंडा बेन्सिक-अलेझांडर व्हेरेक्ह यांच्यावर 4-0, 5-3. कॅरोलिना मुचोवा-अँड्री रुबलेव्ह यांन रेली ओपेल्का-व्हीनस विल्यम्स यांच्यावर 4-2, 5-4 (7-4) असा विजय मिळविला. उपांत्यपूर्व फेरी : सारा इरानी-आंद्रिया वावसोरी यांनी कॅरोलिना मुचोव्हा-आंद्रे रुबलेव्ह यांना 4-1, 5-4 (7-4), कॅस्पर रुड-इगा स्वायटेक यांनी कॅटी मॅकनॅली-लोरेन्झो मुसेट्टी यांना 4-1, 4-2, जॅक ड्रेपर-जेसिका पेगुला यांनी मिरा अँड्रीवा-डॅनिल मेदव्हेदेव यांना 4-1, 4-1. डॅनियल कॉलिन्स-ख्रिश्चन हॅरिसन यांनी बेन शेल्टन-टेलर टाऊनसेंड यांना 4-1, 5-4 (7-2) असे हरविले.









