नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरी भागात एका आयएफएस (भारतीय विदेश सेवा) अधिकाऱ्याने एका इमारतीवरुन उडी घेत आत्महत्या केली आहे. दिल्ली पोलिसांनी यासंबंधी शुक्रवारी माहिती दिली आहे. संबंधित अधिकारी अनेक दिवसांपासून तणावाखाली होता असे सांगण्यात येत आहे. मृत अधिकाऱ्याचे नाव जितेंद्र रावत आहे. जितेंद्र रावत हे नैराश्यात होते आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. रावत यांनी शुक्रवारी सकाळी इमारतीवरून उडी घेत आयुष्य संपविले. चाणक्यपुरी येथील विदेश मंत्रालयाचे क्वार्टर्स असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ते राहत होते. आत्महत्येप्रकरणी चौकशी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तर आयएफएस अधिकाऱ्याच्या मृत्यूनंतर विदेश मंत्रालयाने वक्तव्य जारी केले आहे. संबंधित अधिकाऱ्याच्या परिवाराला शक्य ती सर्व मदत केली जात असून आम्ही दिल्ली पोलिसांच्या संपर्कात आहोत. दु:ख अन् संकटाच्या या क्षणी आम्ही अधिकाऱ्याच्या परिवारासोबत आहोत. शोकाच्या या काळात परिवाराच्या खासगीत्वाचा सन्मान करण्याची आवश्यकता विचारात घेत आम्ही पुढील माहिती जारी करत नसल्याचे विदेश मंत्रालयाने म्हटले आहे.
Previous Articleतहव्वूर राणाचा स्थगिती अर्ज फेटाळला
Next Article अलाहाबादियाने केली क्षमायाचना
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









