मुंबई :
आयएफजीएल रिफ्रॅक्टरीजच्या समभागाने गुंतवणूकदारांना उत्तम परतावा दिला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सदरच्या समभागाने गेल्या महिन्याभरातच गुंतवणूकदारांना 87 टक्के इतका उत्तम परतावा देऊ केला आहे. कंपनीने दुसऱ्या तिमाहीत नफ्यात दमदार कामगिरी केली असल्याचे बोलले जात आहे. 459 कोटी रुपयांचा महसूल दुसऱ्या तिमाहीत कंपनीने आपल्या नावावर केला आहे. बुधवारी 8 टक्के वाढत कंपनीचा समभाग 879 रुपयांच्या नव्या उंचीवर पोहचला आहे.









