प्रतिनिधी/ पणजी
गोव्यात 20 रोजी ते 28 रोजी दरम्यान होणाऱया 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (इफ्फी) सुरूवात ‘अल्मा अँड ऑस्कर’ या ऑस्ट्रियन चित्रपटाने होणार आहे. व्हिएनीज समाजात प्रति÷ित असलेली महिला अल्मा महलर (1879-1964) आणि ऑस्ट्रियन कलाकार ऑस्कर कोकोस्का (1886-1980) यांच्यातील उत्कट आणि तरल नातेसंबंध हा या चरित्रपटाचा विषय आहे.
डायटर बर्नर दिग्दर्शित हा चित्रपट एकूण 110 मिनिटे कालावधीचा आहे. संगीतकार आणि कलाकार यांच्यातील प्रेमसंबंध उलगडणाऱया चित्रपटाने सिनेमा या कलाप्रकाराचा उत्सव साजरा करणाऱया इफ्फी 53 ची सुरुवात होणं, अगदी समर्पक आहे.
ऑस्कर कोकोस्का ही एक उदयोन्मुख चित्रकार आहे. तिचा पहिला नवरा गुस्ताव महलरच्या मृत्यूनंतर, वास्तुविशारद वॉल्टर ग्रोपियस याच्याशी तिचे संबंध सुरू झाले असताना, ती अल्मा एका संगीत संयोजकाच्या संपर्कात येते. आपल्यामधील कलाकाराला स्वतःची ओळख मिळणार नाही, अशा दुसऱया एका पुरुषाबरोबर राहायचं नसल्यामुळे अल्मा, ऑस्कर कोकोस्काबरोबर एक ज्वलंत प्रेमसंबंध सुरू करते. त्यांच्या नातेसंबंधांचं स्वरूप असं आहे, की कोकोस्का, त्याच्यावर आधारित आपली सर्वात प्रसिद्ध कलाकृती चित्रित करतो. हा चित्रपट त्यांच्या नात्याचा वेध घेतो, ज्याचं वर्णन ‘वादळी’ आणि ‘तरल’ असं केलं आहे.
दिग्दर्शक डायटर बर्नर हे प्रसिद्ध ऑस्ट्रियन चित्रपट आणि नाटय़ दिग्दर्शक, अभिनेता आणि पटकथा लेखक आहेत. 1976-1980 या काळात चाललेल्या, अल्पेनसागा या कौटुंबिक आणि ग्रामीण पार्श्वभूमीवरच्या सहा पुरस्कार विजेत्या चित्रपटांनी त्यांना ऑस्ट्रियामध्ये दिग्दर्शक म्हणून ओळख मिळाली. स्नत्झिलर यांच्या, डेर रीन या नाटकावर आधारित बर्लिनर रेगेन (2006) या त्यांच्या चित्रपटामुळे ते आंतरराष्ट्रीयस्तरावर प्रशंसेचे मानकरी ठरले. ‘अल्मा अँड ऑस्कर’चे प्रदर्शन रविवार, 20 रोजी आयनॉक्स पणजी येथे प्रदर्शित करण्यात येणार आहे.









